हुंडा मिळाला नाही म्हणून पतीने केला 'तो' कारनामा! पत्नीला मृत घोषित केलं अन्... अखेर पीडितेनं काय केलं?

मुंबई तक

एका विवाहितेला तिच्या सरकारी डॉक्यूमेंट्समध्ये मृत घोषिक दाखवण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. संबंधित महिला गेल्या तीन महिन्यांपासून तिच्या कागदपत्रांमध्ये दुरुस्ती करण्यासाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी धावत राहिली.

ADVERTISEMENT

पत्नीला मृत घोषित केलं अन्...
पत्नीला मृत घोषित केलं अन्... (फोटो सौजन्य: Grok AI)
social share
google news

बातम्या हायलाइट

point

हुंडा मिळाला नसल्याने पतीने केला 'तो' कारनामा!

point

पत्नीला मृत घोषित केलं अन्...

Crime News: राजस्थानच्या भरतपुर येथून एक विचित्र घटना समोर आली आहे. येथे राहणाऱ्या एका विवाहितेला तिच्या सरकारी डॉक्यूमेंट्समध्ये मृत घोषिक दाखवण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. संबंधित महिला गेल्या तीन महिन्यांपासून तिच्या कागदपत्रांमध्ये दुरुस्ती करण्यासाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी धावत राहिली. जेव्हा तिने सरकारी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्ज केला तेव्हा आधारकार्डवर तिचा मृत्यू झाल्याची नोंद आढळली. त्यावेळी हे सगळं प्रकरण उघडकीस आलं. 

हुंड्याच्या मागणीसाठी सासरी छळ...

संबंधित महिलेचं नाव दुर्गेश असून तिचं लग्न 2020 मध्ये हाडौलीचा रहिवासी असलेल्या संदीप शर्मा नावाच्या तरुणासोबत झालं. लग्नानंतर, काही दिवसांतच हुंड्याच्या मागणीसाठी सासरी छळ सुरू झाल्याचा पीडितेचा आरोप आहे. 1 एप्रिल 2024 मध्ये उच्चैन पोलीस स्टेशनमध्ये महिलेने तिचा पती आणि सासरच्या लोकांविरुद्ध तक्रार दाखल केली. दुर्गेशने तक्रार करताना सांगितलं की तिने 31 डिसेंबर 2023 रोजी 'ई-मित्र'ला तिच्या कागदपत्रांमध्ये दुरुस्ती करण्यासाठी अर्ज केला होता. मात्र, पीडितेचा मृत्यू झाल्याची नोंद असल्यामुळे तिचं नाव रेकॉर्डमधून वगळण्यात आलं असल्याचं तिला सांगितलं गेलं. आता डेथ सर्टिफिकेट म्हणजेच मृत्यू प्रमाणपत्र न देता एखाद्याला मृत कसं घोषित केलं जाऊ शकतं?, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

हे ही वाचा: "तुझ्यासारख्या कितीतरी 300 रुपयांत..." पतीने असं म्हटलं अन् प्रकरण थेट पोलिसात... 'ते' रहस्य उघडकीस

सगळं काही पतीनेच केलं...

पीडितेने या सगळ्या गोष्टीसाठी आपल्या पतीवर आरोप केले आहेत. आपल्या पतीने हे सर्व घडवून आणलं असल्याचा महिलेनं दावा केला आहे. आरोपी पतीने पत्नीला धडा शिकवण्यासाठी सरकारी कार्यालयांना खोटी माहिती दिली असावी, असं पत्नीचं मत आहे. कागदपत्रांमध्ये मृत घोषित केल्यानंतर, आपल्याला ठिकठिकाणी भटकावं लागत असल्याचं पीडित महिलेनं सांगितलं. तीन महिन्यांपूर्वी आधार कार्डवर पीडितेची मृत म्हणून नोंद करण्यात आली असल्याचं सांगितलं जात आहे. महिलेने सरकारी योजनांअंतर्गत लाभांसाठी अर्ज केल्यावरच हे सगळं उघडकीस आल्याची माहिती आहे. 

हे ही वाचा: एका मुलाच्या आईसोबत केलं लग्न! नंतर, चार मित्रांसोबत मिळून पत्नीसोबत... पुढे घडलं असं काही की...

दरम्यान, प्रशासनाच्या कार्यालयातून कोणतंही मृत्यू प्रमाणपत्र जारी करण्यात आलं नसल्याचं महापालिका प्रशासनाने स्पष्ट केलं. महिलेचं नाव वगळण्याची प्रक्रिया ई-मित्र द्वारे करण्यात आली असून तिथे मृत्यूचं कारण स्पष्ट करण्यात आलं होतं. उच्चैन नगरपालिकेचे कार्यकारी अधिकारी देखील या प्रकरणावर कोणतीही अचूक माहिती देऊ शकले नाहीत. 

हे वाचलं का?

    follow whatsapp