"तुझ्यासारख्या कितीतरी 300 रुपयांत..." पतीने असं म्हटलं अन् प्रकरण थेट पोलिसात... 'ते' रहस्य उघडकीस

मुंबई तक

पती आणि पत्नीमध्ये किरकोळ कारणावरून झालेला वाद बऱ्याचदा टोकाला पोहोचतो आणि यातून धक्कादायक घटना घडत असल्याचं पाहायला मिळतं. उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये अशीच एक घटना घडल्याचं समोर आलं आहे.

ADVERTISEMENT

"तुझ्यासारख्या कितीतरी 300 रुपयांत..." पतीने असं म्हटलं अन...
"तुझ्यासारख्या कितीतरी 300 रुपयांत..." पतीने असं म्हटलं अन...(फोटो सौजन्य: Grok AI)
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पतीने पत्नीला म्हटलं असं काही की... वाद टोकाला पोहोचला

point

प्रकरण थेट पोलिसात... 'ते' रहस्य उघडकीस

Crime News: पती आणि पत्नीमध्ये किरकोळ कारणावरून झालेला वाद बऱ्याचदा टोकाला पोहोचतो आणि यातून धक्कादायक घटना घडत असल्याचं पाहायला मिळतं. उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये अशीच एक घटना घडल्याचं समोर आलं आहे. येथे एका महिलेने आपल्या पतीवर गंभीर आरोप करत त्याच्याविरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये FIR दाखल केल्याचं सांगितलं जात आहे. महिलेने तक्रार करत सांगितलं की, "माझा पती मला नेहमी म्हणतो की तुझ्यासारख्या बायका 300 रुपयांत विकल्या जातात."

आपल्या पतीचे बऱ्याच महिलांसोबत अनैतिक संबंध असल्याचा आरोप पीडितेने केला. इतकेच नव्हे तर, हुंड्यासाठी संबंधित महिलेचा सासरच्या लोकांकडून छळ केला जात असल्याचा आरोप आहे. पीडितेचा पती मथुरा येथे राहत असून तिचं माहेर हाथरसमध्ये असल्याची माहिती आहे. पीडितेने पोलीस स्टेशनमध्ये आपल्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून प्रकरणाचा तपास सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. 

पत्नीने पतीविरुद्ध केली तक्रार 

मिळालेल्या माहितीनुसार, वर्षभरापूर्वी कोतवाली हाथरस जंक्शन परिसरातील एका गावात राहणाऱ्या तरुणीचं मथुरा येथे राहणाऱ्या एका तरुणासोबत झालं. पीडितेच्या वडिलांनी तिच्या लग्नासाठी जवळपास 12 लाख रुपये खर्च केल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र, लग्नात मुलीच्या घरच्यांकडून दिलेल्या हुंड्यामुळे सासरचे लोक समाधानी नव्हते. तसेच, पतीचे बऱ्याच महिलांसोबत अनैतिक संबंध असल्याचा पीडितेने आरोप केला आहे. इतकेच नव्हे तर, पीडितेचा पती तिच्यासोबत अनैसर्गिक लैंगिक संबंध ठेवत असून महिलेने यासाठी विरोध केल्यास तिला जेवण दिलं जात नसल्याचं पीडितेचं म्हणणं आहे. अशा परिस्थितीत, तिला बरेच दिवस उपाशी ठेवलं जात होतं.

हे ही वाचा: एका मुलाच्या आईसोबत केलं लग्न! नंतर, चार मित्रांसोबत मिळून पत्नीसोबत... पुढे घडलं असं काही की...

तसेच पीडितेच्या मते तिचा पती तिला नेहमी म्हणायचा की "तुझ्यासारख्या स्त्रिया 300 रुपयांना विकल्या जातात, मी तुला ठेवणार नाही." त्या विवाहित महिलेनं नाते टिकवण्यासाठी खूप प्रयत्न केले. पण तिच्या सासरच्यांनी तिला घराबाहेर हाकलून लावलं, वारंवार तिचा मानसिक छळ करत तिला काठ्यांनी मारहाण केली. आता, या प्रकरणासंदर्भात महिला पोलिस ठाण्यात हुंडा छळ आणि घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून यासंबंधी तपास सुरू असल्याची माहिती आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp