मुंबईची खबर: मुंबईत पहिला एन्काउंटर नेमका कधी झाला? 'त्या' अंडरवर्ल्ड डॉनविषयी जाणून घ्या...

मुंबई तक

1980 आणि 1990 च्या दशकात जेव्हा अंडरवर्ल्ड डॉन या मोठ्या शहरात दहशत पसरवत होते, तेव्हा मुंबई पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी विशेष पथक नेमलं आणि त्या काळात 'एन्काउंटर स्पेशालिस्ट' हे नाव पुढे आलं.

ADVERTISEMENT

'त्या' अंडरवर्ल्ड डॉनविषयी जाणून घ्या...
'त्या' अंडरवर्ल्ड डॉनविषयी जाणून घ्या...
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मुंबईत पहिला एन्काउंटर नेमका कधी झाला?

point

'त्या' अंडरवर्ल्ड डॉनविषयी जाणून घ्या...

Mumbai News: भारताची आर्थिक राजधानी असलेलं मुंबई हे केवळ स्वप्नांचं शहर नाही तर ते एकेकाळी अंडरवर्ल्डचा बालेकिल्ला देखील होतं. 1980 आणि 1990 च्या दशकात जेव्हा अंडरवर्ल्ड डॉन या मोठ्या शहरात दहशत पसरवत होते, तेव्हा मुंबई पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी विशेष पथक नेमलं आणि त्या काळात 'एन्काउंटर स्पेशालिस्ट' हे नाव पुढे आलं. यामध्ये, प्रभुलाल भोसले, रवींद्र आंग्रे, प्रदीप शर्मा, विजय साळसकर आणि दया नायक यांसारख्या अधिकाऱ्यांनी गुन्हेगारांना लक्ष्य केलं. 

1982 मध्ये मुंबईत पहिला एन्काउंटर...

11 जानेवारी 1982 रोजी मुंबईत पहिला एन्काउंटर करण्यात आला आणि तो म्हणजे मनोहर अर्जुन सुर्वे उर्फ मन्या सुर्वे याचा. वडाळा येथील आंबेडकर महाविद्यालयासमोर पोलिसांनी या कुख्यात अंडरवर्ल्ड गुंडाचा एन्काउंटर केला. ही देशातील पहिली ज्ञात चकमक मानली जाते. पोलीस अधिकारी राजा तांबट आणि इसाक बागवान यांनी हे एन्काउंटर घडवून आणलं होतं. त्यानंतर, 16 नोव्हेंबर 1991 रोजी अंधेरी लोखंडवाला येथे ATS ने केलेल्या चकमकीत मनोहर डोलस उर्फ माया डोलस ठार झाला.

यामुळे मुंबईत गँगवॉर आणि त्यांच्यावर पोलिसांच्या कारवाईची लाट उसळली. दाऊद गँग, छोटा राजन गँग आणि अरुण गवळी याच्या टोळीतील शेकडो शूटर पोलिसांच्या गोळीबारात मारले गेले. 1990 ते 2003 या काळात जवळपास 600 हून अधिक एन्काउंटर केले गेले असल्याचा अंदाज आहे. हा काळ मुंबई पोलिसांचं 'एन्काउंटर राज' म्हणून ओळखला गेला. 

हे ही वाचा: प्रतिष्ठित बीडी व्यावसायिकाची हत्या! किरकोळ कारणावरून मुलासोबत वाद, वडिलांवर गोळी झाडली अन् नंतर स्वत:च्या डोक्यात...

2000 च्या दशकानंतर एन्काउंटरवर बंधने...

2000 च्या दशकानंतर, न्यायपालिका आणि मानवाधिकार संघटनांच्या दबावामुळे एन्काउंटरवर बंधने वाढली. त्यावेळी, अनेक प्रकरणांची चौकशी सुरू करण्यात आली आणि काही अधिकाऱ्यांवर बनावट म्हणजेच खोट्या एन्काउंटरचा आरोपही करण्यात आला होता. तरी सुद्धा, मुंबई पोलिसांचं चकमकीचं हे धोरण गुन्हेगारी जगतात भितीचं कारण ठरलं. 

हे वाचलं का?

    follow whatsapp