10 वर्षांच्या चिमुकलीवर मंदिरात नेऊन सामुहिक बलात्कार; कपडे धुण्यासाठी विहिरीवर गेल्यानंतर नराधमांनी उचलून नेलं

मुंबई तक

Mathura Rape Case : 10 वर्षांच्या चिमुकलीवर मंदिरात नेऊन सामुहिक बलात्कार; कपडे धुण्यासाठी विहिरीवर गेल्यानंतर नराधमांनी उचलून नेलं

ADVERTISEMENT

Mathura Rape Case
Mathura Rape Case
social share
google news

बातम्या हायलाइट

point

10 वर्षांच्या चिमुकलीवर मंदिरात नेऊन सामुहिक बलात्कार

point

कपडे धुण्यासाठी विहिरीवर गेल्यानंतर नराधमांनी उचलून नेलं

Mathura Rape Case : धार्मिक आणि सांस्कृतिक नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उत्तर प्रदेशातील मथुरामध्ये मानवतेला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. मागासवर्गीय समाजातील केवळ 10 वर्षांच्या चिमुकलीवर दोन नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची माहिती मिळाली आहे. शनिवारी (१ नोव्हेंबर) मथुराच्या मागोर्रा पोलिस ठाणे हद्दीतील एका गावात ही अमानुष घटना घडली.

कपडे धुण्यासाठी विहिरीवर गेल्यानंतर नराधमांनी उचलून नेलं 

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आपल्या मोठ्या बहिणीसह गावाजवळील विहिरीवर कपडे धुण्यासाठी गेली होती. काही वेळाने मोठी बहीण कपडे धुऊन घरी परतली, तर चिमुकली तेथेच थांबली. त्याचवेळी दुचाकीवरून दोन युवक तेथे आले आणि त्यांनी पिण्यासाठी पाणी मागितले. परिसरा कोणीही नसल्याचे पाहून त्यांनी मुलीला जवळच असलेल्या मंदिरात नेले आणि तिच्यावर अत्याचार केला.

बराच वेळ उलटून गेल्यानंतरही मुलगी घरी न परतल्याने तिची बहीण तिला शोधत पुन्हा विहिरीकडे गेली. तेव्हा तिला मंदिरातून आपल्या बहिणीच्या किंकाळ्या ऐकू आल्या. ती ताबडतोब त्या दिशेने धावली असता, आरोपी युवक तिथून पळून गेले. मोठ्या बहिणीने ताबडतोब गावकऱ्यांना बोलावले आणि घटनेची माहिती पोलिसांना दिली.

हेही वाचा :  माझ्यावर दबाव टाकण्यासाठी कुटुंबियांविरोधात खटले दाखल केले, माजी सरन्यायाधीशांचे सनसनाटी आरोप

हे वाचलं का?

    follow whatsapp