बाथरूममध्ये दिला 4 मुलांना जन्म... पण, कपाटात सापडले चौघांचे मृतदेह अन्... भयानक कहाणी वाचून जाल हादरून

मुंबई तक

एका 39 वर्षीय महिलेने आधीच 4 बाळांना मुलांना जन्म दिला, पण नंतर तिने आपल्या मुलांचा जीव घेतला आणि त्यांचे मृतदेह घरात लपवून ती बरीच वर्षे त्याच घरात राहिली असल्याची एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

ADVERTISEMENT

कपाटात सापडले चौघांचे मृतदेह अन्...
कपाटात सापडले चौघांचे मृतदेह अन्...
social share
google news

बातम्या हायलाइट

point

बाथरूममध्ये दिला 4 मुलांना जन्म...

point

पण, कपाटात सापडले चौघांचे मृतदेह अन्...

point

भयानक कहाणी वाचून थक्कच व्हाल!

Crime news: एका 39 वर्षीय महिलेने आधीच 4 बाळांना मुलांना जन्म दिला, पण नंतर तिने आपल्या मुलांचा जीव घेतला आणि त्यांचे मृतदेह घरात लपवून ती बरीच वर्षे त्याच घरात राहिली असल्याची एक धक्कादायक  बातमी समोर आली आहे. नेमकं प्रकरण काय? खरं तर, प्रकरणाती खुनी आईचं नाव जेसिका माउथे (Jessica Mauthe)असून तिने तिच्या स्वतःच्या चार मुलांचे मृतदेह आपल्याच घरात लपवले होते. आरोपी जेसिकाच्या घरातील एका कपाटात एका नवजात बाळाचा मृतदेह टॉवेल आणि कचऱ्याच्या पिशव्यांमध्ये गुंडाळलेला आढळला. तसेच, तिने आणखी तीन नवजात बाळांचे मृतदेह निर्दयपणे लॉफ्टमध्ये लपवले होते.

कपाटात नवजात बाळांचे मृतदेह... 

काही आठवड्यांपूर्वी जेसिकाच्या घरमालकाने तिला घराबाहेर काढण्याची नोटीस पाठवली होती आणि तेव्हाच हे प्रकरण संपूर्ण उघडकीस आलं. घरमालक जेसिकाच्या घरातील सामानाची तपासणी करण्यासाठी आला असता त्याला घरातील एका कपाटात टॉवेल आणि कचऱ्याच्या पिशव्यांमध्ये गुंडाळलेल्या नवजात बाळाचा मृतदेह आढळला. त्याने लगेच पोलिसांना फोन केला. पोलिसांनी घराची झडती घेतली तेव्हा त्यांना लॉफ्टमध्ये आणखी तीन नवजात बाळांचे मृतदेह आढळलेय ते टोट बॅग्स आणि बकेट्समध्ये लपवले होते. मात्र, या प्रकरणासंदर्भात तिला न्यायलयात हजर केल्यानंतर तिने स्वत:वरील सर्व आरोप फेटाळून लावले. 

चारही बाळांबद्दल वेगवेगळं विधान 

पोलिस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, जेसिकाने तिच्या चारही बाळांबद्दल वेगवेगळं विधान केलं आणि तिने आपल्या मुलांना बाथरूममध्ये जन्म दिल्याचं सांगितलं. पहिल्या मुलाबद्दल तिने सांगितलं की तिला हळू आवाज ऐकू आला आणि नंतर ती बेशुद्ध पडली. जेव्हा तिला शुद्धीवर आली तेव्हा ते मूल मृतावस्थेत होतं. दुसऱ्या आणि तिसऱ्या बाळाबद्दल ती म्हणाली की कदाचित ते मृत जन्माला आले असतील कारण त्यांच्या रडण्याचा कोणताही आवाज ऐकू आला नाही. 

हे ही वाचा: मुंबईची खबर: मीरा भाईंदरमध्ये महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीला वेग... कधी निघणार लॉटरी?

चौथ्या मुलाबद्दल तिने वेगळीच कहाणी सांगितली. जेसिकाने तिच्या चौथ्या मुलाला बाथरूममध्ये जन्म दिला आणि तेव्हा ते बाळ जिवंत होतं. तिने बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकला पण काही मिनिटे ते मुल तिने तिथेच ठेवलं. त्यानंतर, एका टॉवेलमध्ये गुंडाळलं आणि तो शांत होईपर्यंत सुमारे 15 ते 20 मिनिटे त्याला आपल्या मांडीवर ठेवलं. या बाळाचा मृत्यू तिच्या पकडीमुळे झाला की त्याचं तोंड आणि नाक झाकलं गेलं होतं, याबद्दल काहीच माहीत नसल्याचं तिने सांगितलं. 

हे वाचलं का?

    follow whatsapp