Nashik : ठाकरेंच्या सभेआधीच शिंदेंनी दिला झटका! शिवसेनेला मोठं खिंडार

मुंबई तक

शिवसेनेला (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नाशिकमध्ये (Nashik) आणखी धक्का बसलाय. गेल्या महिन्यात काही माजी नगरसेवकांनी एकनाथ शिंदेंच्या (Eknath shinde) नेतृत्वाखालील बाळासाहेबांच्या शिवसेना (balasahebanchi shiv sena) पक्षात प्रवेश केल्यानंतर आता आणखी 50 पेक्षा अधिक पदाधिकाऱ्यांनी ठाकरेंची शिवसेना (Thackeray Faction) सोडलीये. यात शिवसेना (Shiv Sena), युवा सेना (Yuva Sena), शिव वाहतूक सेना (Shiv vahatuk Sena) आणि ठाकरेंच्या शिवसेनेशी […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

शिवसेनेला (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नाशिकमध्ये (Nashik) आणखी धक्का बसलाय. गेल्या महिन्यात काही माजी नगरसेवकांनी एकनाथ शिंदेंच्या (Eknath shinde) नेतृत्वाखालील बाळासाहेबांच्या शिवसेना (balasahebanchi shiv sena) पक्षात प्रवेश केल्यानंतर आता आणखी 50 पेक्षा अधिक पदाधिकाऱ्यांनी ठाकरेंची शिवसेना (Thackeray Faction) सोडलीये. यात शिवसेना (Shiv Sena), युवा सेना (Yuva Sena), शिव वाहतूक सेना (Shiv vahatuk Sena) आणि ठाकरेंच्या शिवसेनेशी संबंधित पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.

नाशिक जिल्हा शिवसेनेचा बाल्लेकिल्ला म्हणून ओळखला जातो. शिवसेनेत फूट पडल्यापासून शिंदे विरुद्ध ठाकरे यांच्यात राजकीय कुरघोड्या जिल्ह्यात दिसत आहे. आगामी नाशिक महापालिकेच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीही सुरू केलीये. अशात ठाकरे गटाला शिंदे गटाने धक्का दिलाय.

उद्धव ठाकरे यांची नाशिकमध्ये सभा होण्यापूर्वीच शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) 50 पेक्षा अधिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवबंधन तोडून बाळासाहेबांच्या शिवसेनेची ढाल-तलवार हाती घेतलीये. या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.

‘…आणि मग मी दाखवतो’, संतापलेल्या संजय राऊतांचं नारायण राणेंना चॅलेंज

हे वाचलं का?

    follow whatsapp