“तुमचा दाभोळकर करू”, शरद पवारांना सोशल मीडियावरून जीवे मारण्याची धमकी
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना ट्विटरवरुन जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ज्या प्रकरणी सुप्रिया सुळे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेऊन तक्रार नोंदवली आहे.
ADVERTISEMENT

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांना (Sharad Pawar) ट्विटरवरुन (Twitter) जीवे मारण्याची धमकी आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या धमकीनंतर सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली त्यानंतर माध्यमांशी बोलताना याबाबतची माहिती दिली. ‘पवारांना काही झालं तर गृहखातं जबाबदार असेल.’ असा इशारही सुप्रिया सुळे यांनी यावेळी दिला. ncp chief sharad pawar death threats tweet Supriya Sule mumbai police commissioner filed a complaint home minister devendra fadnavis
शरद पवारांना ट्विटरवरुन धमकी देण्यात आल्याचं समोर आलं आहे. दोन ट्विटर हॅडलवरुन ही धमकी देण्यात आल्याचं समोर आली आहे. त्यानंतर सकाळीच सुप्रिया सुळे यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या शिष्टमडंळाने मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची भेट घेऊन याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे..
‘तुमचा लवकरच दाभोलकर होणार’ अशा प्रकारची धमकी एका पोस्टच्या माध्यमातून देण्यात आली आहे. तर दुसरीकडे BJP अॅक्टिव्हिस्ट असा बायो असलेल्या सौरभ पिंपळकर नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन देखील राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना धमकी देण्यात आली आहे.
पोलीस आयुक्तांना भेटल्यानंतर सुप्रिया सुळे संतापल्या
माध्यमांशी संवाद साधताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘ट्विटरवरुन हा मेसेज आला आहे. कोणत्या तरी वेबसाइटवरुन धमकी दिली जात आहे. तसंच त्यांचे जे फॉलोवर्स आहेत या बाबतीतल अशा कमेंट आल्या आहेत. ज्या अतिशय आक्षेपार्ह आहेत. या प्रकरणी गृह विभागाने तातडीने त्याची नोंद घ्यावी. मी आज मुंबईच्या सीपीपर्यंत हे पोहचवलं आहे. पवार साहेबांबाबत जी धमकी ज्या पद्धतीने आली आहे ते दुर्दैवी आहे. राजकारणात मतभेद जरूर असतात. पण आता जेवढा द्वेष ज्या पद्धतीने पसरवला जात आहे समाजात. ते खूपच दुर्दैवी आहे.’