Pune Metro : तुकाराम मुंढेंचा कॉल.. दुकानाला सील आणि पुण्यात पेढ्यांचा कहर
Pune Metro : पुण्यातील खराडी आणि वडगाव शेरी परिसरात पेढे खाल्ल्यानंतर अनेक जणांना उलट्या, जुलाब आणि गंभीर डिहायड्रेशनचा त्रास झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी एफडीएकडून नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असून संबंधित डेरीवर कारवाई करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
Pune Metro : तुकाराम मुंढेंचा कॉल..
दुकानाला सील आणि पुण्यात पेढ्यांचा कहर
Pune Metro : पुण्यातील खराडी परिसरात नवीन कारच्या डिलिव्हरीचा आनंद साजरा करण्यासाठी एका कुटुंबाने मिठाईचे पेढे वाटले आणि त्यानंतर काही तासांतच अनेक जण आजारी पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मोठ्या भावाने नवीन कार घेणार असल्याने लहान भाऊ आपल्या कुटुंबीयांसह शोरूममध्ये गेला होता. दोन्ही भावांचे आई-वडील, नातेवाईक आणि मित्रपरिवार उपस्थित होते. आनंदाच्या वातावरणात वडगाव शेरीतील गुरुनानक स्वीट मार्टमधून पेढे घेण्यात आले आणि ते कुटुंबीयांसह शोरूमच्या कर्मचाऱ्यांनाही वाटण्यात आले. मात्र, घरी परतल्यानंतर काही तासांतच उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला आणि अनेकांना रुग्णालयात दाखल करावे लागले.
हेही वाचा : Operation Tiger Live Updates : संजय राऊतांनी 'या' दोन खासदारांसह घेतली ओम बिर्लांची भेट, काय घडणार?
पेढे खाल्ल्यानंतर उलट्या अन् जुलाब
या प्रकरणातील पीडित आसिफ काजी यांनी सांगितले की, कार डिलिव्हरीनंतर त्यांनी स्वतः, कुटुंबीय आणि शोरूममधील कर्मचाऱ्यांना पेढे दिले. त्यांच्या 11 महिन्यांच्या मुलीला सर्वप्रथम उलट्या आणि जुलाब सुरू झाले. त्यानंतर त्यांनाही तीव्र त्रास जाणवू लागला. रात्रभर दोघांनाही सतत उलट्या होत राहिल्या आणि मुलीला गंभीर डिहायड्रेशन झाल्याने तिला रुग्णालयात दाखल करावे लागले. काजी यांनी सांगितले की त्यांच्या कुटुंबातील सात ते आठ जणांना त्याच प्रकारचा त्रास झाला. काहींना औषधांनी आराम मिळाला, तर काहींना रुग्णालयात दाखल करावे लागले. त्यांच्या वडिलांनाही प्रवासादरम्यान तब्येत बिघडल्याने टेंभुर्णी येथे उपचार घ्यावे लागले.
हेही वाचा : 'गदारीचा शिक्का लावून...', ओमराजे निंबाळकरांनी 'तो' व्हिडीओ शेअर करताच कमेंट्सचा पाऊस









