'गदारीचा शिक्का लावून...', ओमराजे निंबाळकरांनी 'तो' व्हिडीओ शेअर करताच कमेंट्सचा पाऊस
Omraje Nimbalkar : ऑपरेशन टायगरची चर्चा सुरु असताना धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी मौन बाळगलंय..दरम्यान, त्यांनी राजमाता जिजाऊ यांना अभिवादन करण्यासाठी एक व्हिडीओ पोस्ट केलाय. त्यावर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडलाय.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
'गदारीचा शिक्का लावून...'
ओमराजे निंबाळकरांनी 'तो' व्हिडीओ शेअर करताच कमेंट्सचा पाऊस
OmRaje nimbalkar : महाराष्ट्राच्या राजकारणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ऑपरेशन टायगरने खळबळ उडाली आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील काही खासदार फुटून शिंदेच्या शिवसेनेत सामील होणार असल्याची चर्चा आहे. यातील दोन खासदारांनी नांदेडमधील विमानतळावरुन दिल्ली गाठल्याची माहिती आहे. मात्र, दुसरीकडे नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे आणि हिंगोलीचे नागेश पाटील आष्टीकर ठाकरेंसोबत असल्याचा दावा खासदार संजय राऊतांनी केलाय. या सर्व घडामोडी दरम्यान, निष्ठावंत म्हणवून घेणारे ओमराजे निंबाळकर सर्वात जास्त चर्चेत आहेत.
हेही वाचा : 'ऑपरेशन टायगर'च्या पार्श्वभूमीवर ओमराजेंचं मौन, आहेत तरी कुठे?
ओमराजे निंबाळकर आहेत तरी कुठे?
ओमराजे निंबाळकर हे काल पवनराजे निंबाळकर यांच्या हत्याप्रकरणाचा निकाल लागणार म्हणून मुंबईत आले होते. मात्र, न्यायालयाने या निकालाची तारीख पुढे ढकलली. त्यानंतर ओमराजे मुंबईतून पुण्यात गेले होते. मात्र, काल रात्रीपासून ऑपरेशन टायगरच्या चर्चा सुरु झाल्यानंतर ते कुठे आहेत? याबाबत अजूनही स्पष्टता आलेली नाही. ओमराजेंनी मौन बाळगल्याने ते ठाकरेंसोबत राहणार की शिंदेंच्या गळाला लागणार? हे अजूनही समजू शकलेली नाही. मात्र, दुसरीकडे ओमराजे निंबाळकर यांनी फेसबुकवर एक व्हिडीओ पोस्ट केलाय. या व्हिडीओमध्ये ते राजमाता जिजाऊ यांना पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांना अभिवादन करताना पाहायला मिळत आहेत. याच व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडलाय. लोकं नेमकं काय म्हणत आहेत? जाणून घेऊयात....
हेही वाचा : ‘ऑपरेशन टायगर’ आधीच ठाकरेंचा सगळ्यात मोठा डाव; मध्यरात्रीच जारी केलं ‘ते’ पत्र, अन्…









