पुण्याची गोष्ट: MSRTC च्या वतीने तेलंगणा, गुजरात आणि मध्य प्रदेशसाठी विशेष टूर पॅकेजेस

मुंबई तक

Pune News : महाराष्ट्र राज्य रस्ते वाहतूक महामंडळाच्या पुणे विभागाने एक मोठा निर्णय घेतला आहे. देशभरातील काही राज्यातील महत्त्वाच्या पर्यटनाची सफारी करण्यासाठी एसटी बसचा दौरा सुरू करण्यात आलेला आहे. पुण्यातून काही तासांतच  इतर राज्यांत बसने प्रवास करता येणार आहे. 

ADVERTISEMENT

Pune News
Pune News
Google CTA

बातम्या हायलाइट

point

महाराष्ट्र राज्य रस्ते वाहतूक महामंडळाच्या पुणे विभागाचा मोठा निर्णय

point

'या' तीन आंतरराज्यांसाठी पुण्यातून बसेसची सुविधा

पुण्याची गोष्ट: महाराष्ट्र राज्य रस्ते वाहतूक महामंडळाच्या पुणे विभागाने एक मोठा निर्णय घेतला आहे. देशभरातील काही राज्यातील महत्त्वाच्या पर्यटनाची सफारी करण्यासाठी एसटी बसचा दौरा सुरू करण्यात आलेला आहे. पुण्यातून काही तासांतच  इतर राज्यांत बसने प्रवास करता येणार आहे. तेलंगणा, गुजरात आणि मध्य प्रदेशातील लोकप्रिय स्थळांचा समावेश असलेल्या आंतरराज्यीय पर्यटनाचा पर्यटकांना आनंद घेता येणार आहे. 

हे ही वाचा : खोटं नाव सांगून तरुणाचा काळाबाजार, अश्लील व्हिडिओमुळे मुलीनं प्यायलं किटकनाशक

तेलंगणाच्या हैदराबादमधील पर्यटनाचा आनंद घेता येणार

या महिन्यात धार्मिक सेवा सुरू असून ऐतिहासिक आणि पर्यटन स्थळांवर जाण्यासाठी या सेवांची तयार  करण्यात आली. असंख्य कुटुंबे, ज्येष्ठ नागरिक, यात्रेकरू आणि संघटित गटांना प्रवासाचा सोयीस्कररित्या पर्याय उपलब्ध झालाय. एम.एस.आर.टी.सी.ने दिलेल्या माहितीनुसार, तेलंगणाच्या हैदराबादमधील चारमिनार, गोलकोंडा किल्ला, हुसेन सागर तलाव, बिर्ला मंदिर आणि रामोजी फिल्म सिटीसारख्या पर्यटन स्थळांचा समावेश केला.

गुजरातच्या पॅकेजनुसार महत्त्वाच्या पर्यटन स्थळी जाता येणार 

गुजरातच्या पॅकेजनुसार, सोमनाथ मंदिर, द्वारकाधीश मंदिर, नागेश्वर ज्योतिर्लिंग, द्वारका बेट, त्रिवेणी संगम, गिर राष्ट्रीय उद्यान, स्टॅच्यू ऑफ युनिटी, तसेच साबरमती आश्राम, इतर काही पर्यटन स्थळे आणि गांधीनगर अक्षरधामसारख्या ठिकाणांचा समावेश करण्यात आलाय.  

मध्य प्रदेशातील दौऱ्यासाठी पर्यटकांना भेट देता येणार 

तर मध्य प्रदेशातील दौऱ्यासाठी उज्जेनमधील महाकालेश्वर ज्योतिर्लिंग, ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग, देवी हरिसिद्धि मंदिर, काळभैरव मंदिर, ऐतिहासिक मांडू किल्ला, सांची स्तूप, भीमबेटका, रॉक शेल्टर्स, खजुराहो ग्रुप ऑफ मोन्युमेंट्स, पचमारहिल स्थानकाजवळील असलेल्या पचमरहिल स्थानकाला भेट दिली जातेय.