राज ठाकरे म्हणाले 4 तारखेनंतर ऐकणार नाही, अन् मुस्लिम पदाधिकार्‍यांचे राजीनामा झाले सुरु

मुंबई तक

वसंत मोरे, बारामती: औरंगाबादमध्ये झालेल्या सभेमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे भोंग्याच्या मुद्द्यावर कायम असल्याचं दिसून आलं. एवढंच नव्हे तर त्यांनी तीन तारखेनंतर मशिदीसमोर हनुमान चालीसा वाजविण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. पण आता राज ठाकरेंच्या या भूमिकेमुळे गेल्या 16 वर्षांपासून मनसेमध्ये कार्यरत असलेले दौंड शहरातील मनसेचे शहराध्यक्ष जमीर सय्यद यांनी राजीनामा दिला आहे. मनसेचे राज्य उपाध्यक्ष […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

वसंत मोरे, बारामती: औरंगाबादमध्ये झालेल्या सभेमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे भोंग्याच्या मुद्द्यावर कायम असल्याचं दिसून आलं. एवढंच नव्हे तर त्यांनी तीन तारखेनंतर मशिदीसमोर हनुमान चालीसा वाजविण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. पण आता राज ठाकरेंच्या या भूमिकेमुळे गेल्या 16 वर्षांपासून मनसेमध्ये कार्यरत असलेले दौंड शहरातील मनसेचे शहराध्यक्ष जमीर सय्यद यांनी राजीनामा दिला आहे.

मनसेचे राज्य उपाध्यक्ष सुधीर पाटसकर यांच्याकडे त्यांनी राजीनामा दिला आहे. जमीर सय्यद हे गेल्या तीन वर्षांपासून मनसेचे शहराध्यक्ष पदावर होते.

हनुमान चालीसा आणि भोंग्याच्या मुद्द्यावरुन मनसेमधील मुस्लिम समाजातील कार्यकर्ते नाराज असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यातूनच राजीनामा देत असल्याचे जमीर सय्यद यांनी स्पष्ट केले आहे. यापूर्वी वाहतूक सेनेचे अध्यक्षपद पुणे जिल्हा कामगार सेना एसटी महामंडळाच्या सदस्य पदावर होतो असे ते म्हणाले.

राज ठाकरे यांच्या औरंगाबादच्या सभेनंतर आम्ही नाराज असल्याचे सांगत राजीनामा दिल्याचे सय्यद यांनी सांगितले आहे. दरम्यान, याआधीही मनसेतील कल्याणमधील अनेक मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी याच कारणावरुन मनसेला रामराम केला आहे. त्यामुळे आगामी काळात राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे त्यांचे मुस्लिम पदाधिकारी आणि मतदार दुरावण्याची शक्यता अधिक आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp