Ratnagiri: नीलिमा चव्हाणचा नेमका मृत्यू कसा झाला?, पोलिसांनी दिली मोठी माहिती
दापोली येथील स्टेट बँकेत कंत्राटी कर्मचारी असलेली नीलिमा चव्हाण हिचा मृत्यूप्रकरणी एक मोठी अपडेट आता समोर आली आहे. जाणून घ्या दाभोळ पोलिसांनी नेमकी काय माहिती दिली आहे.
ADVERTISEMENT

Neelima Chavan Death: गोकूळ कांबळे, दाभोळ: दापोली (Dapoli) येथील स्टेट बँकेत कंत्राटी कर्मचारी असलेली नीलिमा चव्हाण (Neelima Chavan) हिचा मृत्यू नेमका कसा झाला याबाबत अद्यापही स्पष्टता आलेली नाही. मात्र, याबाबत एक अत्यंत मोठी अपडेट आता समोर आली आहे. दाभोळ पोलिसांनी (Dabhol Police) याबाबत एक नवी माहिती दिली आहे. त्यानुसार प्रथमदर्शनी नीलिमाची हत्या (Murder) झाली नसल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याशिवाय नीलिमाचा मृतदेह जेव्हा आढळून आला होता तेव्हा तिचे केस आणि भुवया नसल्याचं समोर आलं होतं. मात्र, तिचे केस आणि भुवया कोणीही काढले नसल्याचंही पोलिसांनी म्हटलं आहे. (ratnagiri how exactly did neelima chavan die dabhol police gave big information crime news update)
नीलिमाच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती..
दिनांक 1 ऑगस्ट 2023 रोजी दाभोळच्या खाडीत मृत अवस्थेत मिळालेल्या नीलिमा चव्हाणचे अनुषंगाने दाभोळ पोलीस स्टेशन अधिक तपास करीत असून आजवरच्या तपासात प्रथम दर्शनी निष्पन्न झालेल्या बाबी खालील प्रमाणे:
1. नीलिमा हिचा शवविच्छेदन (Postmortem) रिपोर्ट प्राप्त झाला असून त्यामध्ये नीलिमाच्या शरीरावर कुठल्याही मृत्यूपूर्व जखमा तसेच अंतर्गत जखमा (Internal Injuries) दिसून आलेल्या नाहीत.
2. Postmortem Notes मध्ये डॉक्टरांनी Viscera तपासणी करिता राखीव ठेवला असून लवकरच Viscera तपासणी रिपोर्ट प्राप्त होताच मृत्यूचे कारण निश्चित होणार आहे.