Bhandara : मैत्रिणीला लॉजवर घेऊन गेला, अन् व्हायग्राच्या अतिसेवनाने…तरूणासोबत नेमकं काय घडलं?
भंडाऱ्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एक जोडपं लॉजवर रात्र घालण्यासाठी गेले होते. या दरम्यान रात्री संबंध ठेवण्यासाठी तरूणाने शक्तीवर्धक गोळ्या घेतल्या होत्या. या गोळ्यांचे अतिसेवन केल्यामुळे तरूणाला हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली
ADVERTISEMENT
भंडाऱ्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एक जोडपं लॉजवर रात्र घालण्यासाठी गेले होते. या दरम्यान रात्री संबंध ठेवण्यासाठी तरूणाने शक्तीवर्धक गोळ्या घेतल्या होत्या. या गोळ्यांचे अतिसेवन केल्यामुळे तरूणाला हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली. या घटनेने 27 वर्षीय तरूणाच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे, तर गावात हळहळ व्यक्त आहे.(a boy death heart attack due to overdose viagra while physical with girl friend bhandara nagpur story)
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनूसार, 27 वर्षीय तरूण हा मुळचा नागपूरचा रहिवासी होता. तर त्याची 23 वर्षीय मैत्रीण ही मुळची गोंदियाची आहे. काही महिन्यापूर्वीच या दोघांची भेट झाली होती.या भेटीचे पुढे मैत्रीत रूपांतर झाले होते. आणि त्यानंतर दोघांना एकमेकांशी प्रेम झाले होते. नात्यात आल्यानंतर काही दिवसांनी या दोघांनी एकत्र संपूर्ण दिवस घालवण्याचा निर्णय़ घेतला. ठरल्यानुसार दिवसभर दोघेही खूप फिरले, शापिंग, मजामस्ती असे सर्वच काही या एका दिवसात केले. त्यानंतर रात्री भंडाऱ्याच्या हिरणवार लॉजवर मुक्काम केला होता.
हे ही वाचा : Chandrayan 3 Prakash Raj tweet : चांद्रयान-3 वर ‘चायवाला’च्या जोकमुळे ट्रोल झालेल्या प्रकाश राजने लँडिंगनंतर केलं ‘हे’ ट्वीट
मेडिकलमधून घेतल्या शक्तीवर्धक गोळ्या
रात्री लॉजवर जाण्यापुर्वी तरूणाने मेडिकलमधून शक्तीवर्धक (व्हायग्रा) 4 गोळ्या खरेदी केल्या होत्या. आणि तरूणीसोबत संबंध ठेवताना तरूणाने यापैकी 2 शक्तीवर्धक (व्हायग्रा) गोळ्यांचे सेवन केले होते. यावेळी संबंध ठेवताना तरूणाचा रक्तदाब अचानक वाढला आणि हृदयविकाराचा झटका येऊन तो जमिनीवर कोसळला. प्रियकर जमीन कोसळल्याच्या पाहून तिला देखील मोठा धक्का बसला. त्यामुळे तिने लगेच या घटनेची माहिती लॉज मालकाला दिली. यानंतर तरूणाला रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले होते. तरूणाच्या या मृत्यूने त्याच्या कुटुंबासह मुलीला मोठा धक्का बसला होता.
हे वाचलं का?
दरम्यान या घटनेनंतर शक्तीवर्धक (व्हायग्रा) गोळ्यांचे अतिसेवन केल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक अहवालातून समोर आले होते. सध्या तरूणाचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. या पोस्टमार्टम अहवालातून मृ्त्यूचे काय कारण समोर येते, याकडे आता पोलिसांचे लक्ष लागले आहे.
हे ही वाचा : Mood of the Nation: नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार का?, देशातील जनतेचा काय आहे मूड?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT