पैसे न दिल्याने सातवीत शिकणाऱ्या मुलाने उचललं टोकाचं पाऊल, आई घरी येताच मृतदेह लटकलेला पाहून हंबरडा फोडला
suicide : आईने आपल्या मुलाला पैसे देण्यास न दिल्याच्या कारणावरून मुलाने गळफास घेत जीवन संपवल्याची धक्कादायक घटना.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
इयत्ता सातवीत शिक्षण घेणाऱ्या मुलानं संपवलं जीवन
आईने फोडला हंबरडा
आत्महत्येचं कारण काय?
Suicide : आईने आपल्या मुलाला पैसे देण्यास न दिल्याच्या कारणावरून मुलाने गळफास घेत जीवन संपवलं. अडीच वर्षांपूर्वी वडिलांनी आत्महत्या केल्यानंतर आता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. जेव्हा हा धक्कादायक प्रकार समोर आला तेव्हा मुलाची आई ही कामावर होती. या घटनेनं परिसर हादरून गेला असून नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील लखनऊ येथे घडल्याचे सांगण्यात येत आहे. आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव अंश (वय 12) असे आहे.
हे ही वाचा : लातूर हादरलं! 9 वर्षाच्या चिमुकलीवर 50 वर्षीय वासनांध पुरुषाने खोलीत नेतं केलं लैंगिक शोषण, नंतर गुप्तांग दुखू लागल्यानं...
नेमकं काय घडलं?
या प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मस्तीपूर गावातील रहिवासी पूनम ही महिला पोटापाण्यासाठी घरकाम करते. मंगळवारी ती नेहमीप्रमाणे वृंदावर कॉलनीत घरकाम करण्यासाठी गेली होती. त्यानंतर घरी परतल्यानंतर तिने घराचा दरवाजा वाजवला. तिला कसलाही प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर तिने शेजाऱ्यांना हाक देखील मागितली होती. तेव्हा तिने कुऱ्हाडीने दरवाजा तोडला, त्याचक्षणी तिच्या पोटच्या लेकराने तिच्याच साडीने गळफास घेत आत्महत्या केली. हे चित्र पाहून पूनमच्या पायाखालची जमीन सरकून गेली असता, तिने आरडाओरड करण्यास सुरुवात केली.
या घटनेची माहिती नागरिकांना कळताच त्यांनी पोलिसांना बोलावले. त्यानंतर त्यांनी फासावर लटकलेल्या अंशला उतरवले आणि रुग्णालयात नेले. तेव्हा डॉक्टरांनी अंशला मृत घोषित केले. अंशने टोकाचं पाऊल उचलण्यामागचं खरं कारण काय याचा पोलिसांनी शोध घेण्यास सुरुवात केली. अशातच आता आत्महत्येमागील कारणांचा पोलीस तपास करत आहेत.
हे ही वाचा : बार्शी हादरली, स्टोलने गळा आवळला, शरीरावर 17 वार केले; विवाहितेला क्रूरपणे संपवलं
अंशची आईकडे पैशांसाठी मागणी
संबंधित प्रकरणात पोलिसांनी सांगितलं की, सकाळी अंश त्याच्या आईकडे पैशांची मागणी केली होती, अशा गावकऱ्यांच्या चर्चा होत्या. तेव्हा आईने यावरून फटकारले. नंतर अंशची आई पूनम ही कामावर गेली, परत ती घरी आल्यानंतर तिच्या मुलाचा मृतदेह फासावर लटकलेल्या स्वरुपात दिसला. या घटनेनं गावात शोकाचे वातावरण आहे.










