Maratha Reservation: भर चौकात विष पिऊन तरूणाची आरक्षणासाठी आत्महत्या

मुंबई तक

ADVERTISEMENT

an unfortunate incident has taken place in nanded where a young man committed suicide by drinking poison to get maratha reservation
an unfortunate incident has taken place in nanded where a young man committed suicide by drinking poison to get maratha reservation
social share
google news

Youth Suicide for Maratha Reservation: कुवरचंद मंडले, नांदेड: मराठा आरक्षण (Maratha Reservation) मिळावे यासाठी मागील काही दिवसांपासून सबंध राज्यभरात तीव्र पडसाद उमटत होते, परंतु सरकारने दोन महिन्याचा अवधी मागून घेतल्याने आरक्षणाचा लढा काही अंशी थंडावला आहे. मात्र, असं असलं तरीही मराठा समाजातील तरुणांच्या मनात अजूनही राज्य सरकारच्या उदासीन धोरणामुळे संतापाचे वातावरण आहे. यातच पुन्हा एकदा नांदेड जिल्ह्यातील एका तरुणाने आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना घडल्याचं आता समोर आलं आहे. (an unfortunate incident has taken place in nanded where a young man committed suicide by drinking poison to get maratha reservation)

नेमकी घटना काय?

नांदेड जिल्ह्यातील मरळक येथील दाजीबा कदम या तरुणाने विष पिऊन आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती नुकतीच समोर आली आहे. आत्महत्यापूर्वी दाजीबा कदमने लिहिलेल्या सुसाइड नोटमध्ये राज्य सरकारला जबाबदार धरलं आहे.

या घटनेमुळे जिल्ह्यातील हा चौथा बळी ठरला आहे. दरम्यान, कोणत्याही तरुणांनी असं टोकाचं पाऊल उचलू नये असं अवाहन पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी केलं आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> Ramdas Kadam : ‘उद्धव ठाकरेंनीच मला गुहागरमधून पाडलं’, कदमांनी सांगितली Inside Story

नांदेड तालुक्यातील मरळक येथील दाजीबा रामदास कदम(वय 23 वर्ष) या मराठा युवकाने आरक्षणासाठी विष घेऊन आत्महत्या केली.

नांदेड शहराच्या छत्रपती चौक परिसरातील झेंडा चौक येथे त्याने शनिवारी दुपारी विष प्राशन केलं आणि तिथेच तो बेशुद्ध पडला. ही माहिती त्याच्या नातेवाईकांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन त्याला नांदेडच्या विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.

ADVERTISEMENT

यावेळी रुग्णालयात सकल मराठा समाजाचे बांधव जमा झाले होते. ‘या मुजोर प्रशासनाला असे कीती बळी हवेत?’ असा संतप्त सवाल सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी यावेळी केला आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> Ramdas Kadam : ‘तुमचं पितळ उघड…’, कदमांचा घणाघात, कीर्तिकरांच्या फंडाबद्दल मोठा गौप्यस्फोट

दरम्यान, या घटनेमुळे पुन्हा एकदा राज्य सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला आहे. कोणत्याही तरुणांनी असं टोकाचं पाऊल उचलू नये असं अवाहन पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी केलं आहे. मात्र, अशा प्रकारच्या घटनांमुळे आरक्षणाबाबत तातडीने मार्ग काढण्यासाठी सरकारवर दबाव वाढू लागला आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT