Anju Return to India: पती-मुलांना सोडून पाकिस्तानात गेलेली अंजू पुन्हा परतली भारतात! कारण…

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Anju who left her husband and children to went Pakistan to meet Facebook Friend returned to India
Anju who left her husband and children to went Pakistan to meet Facebook Friend returned to India
social share
google news

Anju Returns from Pakistan : राजस्थानहून पाकिस्तानात जाऊन संपूर्ण भारतात खळबळ उडवणारी अंजू अखेर 4 महिन्यांनंतर भारतात परतली. मात्र, भारतात पाऊल ठेवताच अंजूची पहिली भेट पंजाब पोलीस (PUnjab Police) आणि आयबीशी (IB) झाली आणि तिची बराचकाळ कसून चौकशी झाली. या चौकशीदरम्यान अंजूने भारतात परतण्याचे कारणही उघड केले आहे. (Anju who left her husband and children to went Pakistan to meet Facebook Friend returned to India)

पंजाब पोलीस आणि आयबीच्या प्रश्नांची उत्तरं दिल्यानंतर अंजू अमृतसरहून दिल्ली विमानतळावर पोहोचली. दिल्लीहून ती थेट राजस्थानला जाणार नसून ग्वाल्हेरमध्ये वडिलांच्या घरी जाणार असल्याचं कळतंय.

वाचा: Datta Dalvi : थेट शिंदेंनाच ललकारलं, कोण आहेत बाळासाहेबांचे कडवट शिवसैनिक दत्ता दळवी?

वाघा बॉर्डरवरून भारतात एन्ट्री

विवाहित असूनही अंजूने पाकिस्तानातील तरुणाशी लग्न केले. आता अंजू चार महिन्यांनी परतली आहे. वाघा बॉर्डरमार्गे तिने भारतात प्रवेश केला. पाकिस्तानी पती नसरुल्लाही सीमेपर्यंत तिच्यासोबत होता. पण आयबी आणि पंजाब पोलिसांनी अंजूला वाघा बॉर्डरवरून आधी सोबत नेले. दोन्ही सुरक्षा यंत्रणांनी अंजूची कसून चौकशी केली आणि अंजूने भारतात परतण्याचा तिचा हेतूही सांगितला. दिल्ली विमानतळावर जेव्हा मीडियाला अंजूला प्रश्न विचारायचे होते तेव्हा तिने सर्व प्रश्नांची उत्तरे देऊ असे सांगून टाळले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

अंजू पहिल्या पतीला घटस्फोट देणार?

अंजू आधी तिचा पती अरविंद याला घटस्फोट देईल आणि नंतर मुलांना पाकिस्तानात घेऊन जाण्याचा प्रयत्न करेल, अशी माहिती आयबीच्या सूत्रांनी दिली आहे. सध्या अंजू दिल्लीत आहे आणि येथून ती ग्वाल्हेरसाठी ट्रेन पकडेल. अंजूने मीडियाच्या प्रश्नांना उत्तर देण्यास टाळाटाळ केली असली तरी तिने मीडियासमोर पाकिस्तान आणि तेथील लोकांचे कौतुक केले. ती म्हणाली की, ‘त्यांना चांगले आदरातिथ्य कसे करावे हे माहित आहे. मात्र, भारतात परतताना खूप आनंद होत असल्याचेही अंजूने सांगितले.’ भारतात किती दिवस राहणार हा प्रश्न तिने टाळला.

ADVERTISEMENT

वाचा: प्रेमासाठी मुलीच्या तोंडातच पिस्तूल घातली, तरुणाच्या कृत्याने पोलिसही हादरले

भारतात परतण्याचे कारण काय?

काही दिवसांपूर्वी, नसरुल्लाहने एका पाकिस्तानी यूट्यूबरला दिलेल्या मुलाखतीत अंजू फक्त तिच्या मुलांसाठी भारतात परतत असल्याचे सांगितले होते. तर ऑक्टोबरमध्ये अंजूने स्वतःही असेच सांगितले होते की, तिला तिच्या मुलांची खूप आठवण येते आणि त्यांच्यासाठी भारतात परतणार आहे. एवढंच नाही तर, अंजूने असेही म्हटले होते की तिला तिच्या मुलांना पाकिस्तानात घेऊन जायला आवडेल पण मुलांची इच्छा नसेल तर ती त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव टाकणार नाही.

ADVERTISEMENT

21 जुलै 2023 रोजी अंजू पाकिस्तानात गेली होती. तिथे तिने नसरुल्लाशी लग्न केल्याचे तिने सांगितले. मात्र ती पोलिसांना लग्नाशी संबंधित कोणतेही कागदपत्र दाखवू शकली नाही. यासोबतच अंजूने पाकिस्तानी सुरक्षा एजन्सीशी कोणतेही संबंध नाकारले आहेत.

अंजूचा पहिला पती भडकला

यादरम्यान, अंजूचा पती अरविंद याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला असता नाव ऐकताच तो भडकला. आपल्याला याबाबत काहीही माहिती नसल्याचे त्याने स्पष्टपणे सांगितले. ‘ती भारतात आली आहे की नाही हे मला कसे कळणार?’ असं तो म्हणाला.

वाचा: Datta Dalvi : मोठी बातमी! ठाकरे गटाचे नेते दत्ता दळवींच्या गाडीची तोडफोड

पाकिस्तानात जाण्यापूर्वी अंजू पती अरविंद आणि दोन मुलांसह राजस्थानच्या भिवडी येथे राहत होती. एवढेच नाही तर तिने पाकिस्तानला जाण्याच्या उद्देशाने तिने टुरिस्ट व्हिसा घेतला होता. यानंतर ती पाकिस्तानातील खैबर पख्तुनख्वा येथे राहणाऱ्या नसरुल्लाला भेटण्यासाठी गेली असल्याचं समजलं.

अंजूला कुटुंबीय स्वीकारणार का?

पाकिस्तानमध्ये राहताना अंजूने सोशल मीडियावर काही व्हिडीओ पोस्ट केले होते ज्यामध्ये ती आपल्या मुलांना खूप मिस करत असल्याचे समोर आले होते. पण आता सर्वात मोठा ट्विस्ट असा आहे की, भारतात परतल्यानंतर अंजूचे कुटुंब तिला स्वतःचे म्हणून स्वीकारेल की नाकारेल?

    follow whatsapp

    ADVERTISEMENT