Javier Milei : राष्ट्राध्यक्षांचा गर्लफ्रेंडसोबत स्टेजवरच LipLock, व्हिडीओ व्हायरल

प्रशांत गोमाणे

जेव्हियर मायली यांच्या या कृतीवर आता सर्वस्तरावरून टीका होते आहे.सार्वजनिक पदावर बसलेल्या व्यक्तीने सर्वांसमोर अशी कृती करणे चुकीचे असल्याचे एका युझरने म्हटले आहे.

ADVERTISEMENT

argentine president javier milei kiss in public video viral girf friend liplock video social media
argentine president javier milei kiss in public video viral girf friend liplock video social media
google news

Argentine President Kiss Video : अर्जेंटिनाचे नवे राष्ट्राध्यक्ष जेव्हियर माइली (javier milei) मोठ्या वादात सापडले आहेत. माइली यांनी एका कॉन्सर्टला हजेरी लावली होती. हा कॉर्न्सट त्यांच्याच गर्लफ्रेंडचा होता. या कॉन्सर्टला जेव्हियर माइली यांनी राष्ट्राध्यक्ष (Argentine President)  म्हणून भाषण दिल्यानंतर थेट स्टेजवरच प्रेक्षकांसमोरच गर्लफ्रेंडला किस केल्याची घटना घडली होती. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओनंतर राष्ट्राध्यक्षांच्या या कृतीवर आता सोशल मीडियावर टीका होत आहे. (argentine president javier milei kiss in public video viral girf friend liplock video social media)

अर्जेंटिनाचे नवे राष्ट्राध्यक्ष जेव्हियर मायली मार देल प्लाटाच्या रॉक्सी थिएटरमध्ये रात्री 9.40 वाजताच्या दरम्यान दाखल झाले होते. या थिएटरमध्ये आयोजित कॉन्सर्टसाठी त्यांनी त्यांच्या स्वत:च्या पैशाने तिकीट घेतले होते. कॉन्सर्टमध्ये मायलीची 53 वर्षीय गर्लफ्रेंड फातिमा फ्लोरेजचा परफॉर्मन्स होता.हा परफॉर्मन्स पाहण्यासाठी जेव्हियर मायली आले होते.

हे ही वाचा : Shivsena : ठाकरेंच्या शिवसेना कार्यालयावर बुलडोझर, सांगलीत दोन गटात जबरदस्त राडा

थिएटरमध्ये कलाकारांनी परफॉर्मन्स दिल्यानंतर जेव्हियर मायली यांनी स्टेजवर येऊन भाषण दिले. यावेळी स्टेजवर मायली यांची गर्लफ्रेंड गोल्डन रंगाचा ड्रेस परिधान करून उपस्थित होती. भाषण संपल्यानतर गर्लफ्रेंड फातिमा फ्लोरेज त्यांच्या जवळ आली, यावेळी त्यांनी तिला जवळ घेऊन किस केला होता. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओतील राष्ट्राध्यक्षांच्या कृतीवर अनेकांनी आक्षेप घेतला आहे.

हे वाचलं का?