एकाच वेळी गरोदर राहिल्या यूट्यूबरच्या दोन्ही बायका! बनणार 9 मुलांचा बाप?

मुंबई तक

यूट्यूबर अरमान मलिकच्या घरात पुन्हा गुडन्यूज येण्याची शक्यता आहे. पायल आणि कृतिकाने ‘Baby Coming Soon’ केकसह प्रेग्नन्सीची हिंट दिली आहे. मात्र नेमकी कोण प्रेग्नंट आहे, याचा खुलासा अद्याप झालेला नाही.

ADVERTISEMENT

armaan malik wives payal kritika pregnant again baby coming soon good news 9 kids
अरमान मलिकच्या दोन्ही पत्नी एकाच वेळी गरोदर?
Google CTA

नवी दिल्ली: यूट्यूबर अरमान मलिक आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे कायमच चर्चेत असतो. आता मलिक कुटुंबाकडून पुन्हा एकदा गुडन्यूजची हिंट देण्यात आली आहे. अरमानची पत्नी पायल मलिक आणि कृतिका मलिक यांनी नव्या व्लॉगमध्ये घरात लवकरच नव्या पाहुण्याचे आगमन होणार असल्याचे संकेत दिले आहेत. मात्र, या दोघींमध्ये नेमकी कोण प्रेग्नंट आहे, याचा खुलासा त्यांनी अद्याप केलेला नाही. त्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

‘Baby Coming Soon’ लिहिलेला केक

पायल आणि कृतिकाने शेअर केलेल्या व्लॉगमध्ये ‘Baby Coming Soon’ असा संदेश असलेला केक दिसला. यानंतर प्रेग्नन्सीबाबत चर्चा सुरू झाली. मात्र, हा आनंद नेमका कोणासाठी आहे, हे सांगण्यास पायलने नकार दिला.

पायलने सस्पेन्स कायम ठेवत सांगितले की, गुडन्यूज आहे हे नक्की; पण ती कृतिका कडून आहे की पायल कडून, किंवा दोघींकडून, हे सध्या सांगितले जाणार नाही. कृतिकानेही दोघींपैकी कोणाकडून तरी गुडन्यूज असल्याचे संकेत दिले.