Kalyan: लिव्हर, किडनी, आतडे छेदून बांबू गेला आरपार, मृत्यूच्या दाढेतून वाचला कामगार

मुंबई तक

ADVERTISEMENT

bamboo passed through worker's stomach doctor saved life after 9 hours of surgery kalyan story
bamboo passed through worker's stomach doctor saved life after 9 hours of surgery kalyan story
social share
google news

इमारतीच्या बांधकामाच्या ठिकाणी नेहमी अपघाताच्या घटना घडत असतात. अशाच कल्याणमध्ये सुरु असलेल्या बांधकामाच्या ठिकाणाहून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका कामगाराच्या पोटातून बांबू (Bamboo) आरपार गेल्याची घडना घडली होती. या घटनेनंतर बांधकाम व्यावसायिक (Construction) आणि कामगारांनी (worker) त्याला तत्काळ रूग्णालयात दाखल केले होते.यानंतर डॉक्टरांनी (Doctor) शर्थीचे प्रयत्न करत साधारण 8 ते 9 तास शस्त्रक्रिया करून कामगाराचे प्राण वाचवले होते.डॉक्टरांच्या या कामगिरीचे आता कौतूक होत आहे.(bamboo passed through worker’s stomach doctor saved life after 9 hours of surgery kalyan story)

इमारतीच्या बांधकामासाठी काम करणारा एक कामगार काही फुटांच्या उंचीवर खाली कोसळला होता. यावेळी खाली असलेला एक टोकदार बांबू (Bamboo) त्याच्या पोटाच्या आरपार शिरला होता. हा बाबू थेट पोटाच्या उजव्या कुशीतून लिव्हर, किडनी, आतडे आणि फुफ्फुसाला छेदून आरपार गेला होता. त्यामुळे या कामगाराचे प्राण वाचेल की नाही अशी शंका होती. ही घटना घडताच बांधकाम व्यावसायिकाने आणि इतर कामगारांनी क्षणाचाही विलंब न लावता त्याला नजीकच्या रूग्णालयात दाखल केले होते.

हे ही वाचा : मुंबईत लव्ह जिहाद? भांडूपची मुलगी थेट आझमगडला, नेमकं काय घडलं?

कामगाराची अवस्था अत्यंत बिकट असल्याने डॉक्टरांनी त्वरित रुग्णाला व्हेंटिलेटरवर ठेवत तातडीने आपत्कालीन शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.त्यानुसार एक डॉक्टरांची एक टीम नेमली. हॉस्पिटलचे सर्जन डॉ. शशांक पाटील, डॉ. राजेश राजू , डॉ.अनिकेत वाळिंबे आणि भूलतज्ज्ञ डॉ जितेंद्र बोबडे यांनी साधारण 8 ते 9 तास यशस्वीरित्या शस्त्रक्रिया करून कामगाराला जीवनदान दिले आहे. शस्त्रक्रियेनंतर त्याला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते, येथे देखील त्याची पुरेपुर काळजी घेण्यात आली. आयुष हॉस्पिटलमध्ये या कामगारावर यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली.त्यामुळे कामगाराला नवीन जीवनदान मिळाले. आता डॉक्टरांच्या या कार्याचे कौतूक होत आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

दरम्यान याआधी देखील बदलापूरातून याहून धक्कादायक घटना घजली होती. नवीन इमारतीचे बांधकाचे सूरू असताना, वरून पडलेली सळई (iron bar) तरूणाच्या शरीराच्या आरपार गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर तरूण जमीनीवर बसून सळई आरपार गेल्याचा फोटो समोर आला होता. या 26 वर्षीय तरूणाचे नाव सत्यप्रकाश तिवारी आहे. हा प्रसंग पाहून कामगार वर्गात खळबळ माजली होती. या प्रकरणात तरूणाला रूग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले होते. त्यानंतर या तरूणावर यशस्वीरीत्या शस्त्रक्रिया पार पडली असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.

हे ही वाचा : Crime : चुकीचे इंजेक्शन अन् संशयास्पद मृत्यु, तरूणीसोबत नेमकं काय घडलं? 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT