बीड : 'तसले' व्हिडीओ पाहून 15 वर्षांचा मुलगा सैतान बनला, दोन वर्षांच्या चिमुरडीवर केला अत्याचार; शेवटी हौदात...

मुंबई तक

Beed Crime News : धक्कादायक....अश्लील व्हिडिओ पाहून 15 वर्षांच्या मुलाने दोन वर्षांच्या चिमुरडीवर केला अत्याचार; अंबाजोगाई तालुक्यातील घृणास्पद घटना

ADVERTISEMENT

Beed Crime News
Beed Crime News
google news

बातम्या हायलाइट

point

बीड : 'तसले' व्हिडीओ पाहून 15 वर्षांचा मुलगा सैतान बनला

point

दोन वर्षांच्या चिमुरडीवर केला अत्याचार; शेवटी हौदात...

Beed Crime News, रोहिदास हातागळे/बीड: अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत माणुसकीला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. अवघ्या दोन वर्षे पाच महिने वयाच्या चिमुरडीवर तिच्याच 15 वर्षीय नातेवाईकाने लैंगिक अत्याचार केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे मोबाईलवर अश्लील व्हिडिओ पाहून आरोपीने हे कृत्य केले असून, पीडितेचा मृत्यू झाल्यानंतर शवविच्छेदन अहवालातून हा प्रकार उघड झाला आहे.

शवविच्छेदन केल्यानंतर मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे निदर्शनास आले

अंबाजोगाई तालुक्यातील एका गावातील ही चिमुरडी 17 मार्च 2026 रोजी घरासमोरील पाण्याच्या हौदात पडून मयत झाली होती. सुरुवातीला हा केवळ अपघात वाटत असल्याने अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र, अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी शवविच्छेदन केल्यानंतर मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक मुरलीधर खोकले यांनी पोलीस अधीक्षक नवनीत कांवत, अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने सखोल तपास सुरू केला.

हेही वाचा : मुंबईची खबर : मेट्रो 11 आता वांद्रे टर्मिनसपर्यंत धावणार, कधी सुरु होणार? जाणून घ्या सरकारचा संपूर्ण प्लॅन

 चॉकलेटचे आमिष दाखवून आपल्या दुचाकीवर बसवून नेले

तपासादरम्यान पोलीस निरीक्षक मुरलीधर खोकले आणि त्यांच्या पथकाने अत्यंत गोपनीयरीत्या माहिती गोळा केली. पीडितेच्या मृत्यूनंतर संशयित आरोपी असलेला तिच्या आत्याचा मुलगा (वय 15 वर्षे 5 महिने) हा तीन दिवस जेवला नव्हता आणि सतत रडत होता, अशी माहिती पोलिसांना गुप्त बातमीदारांकडून मिळाली. या संशयावरून पोलिसांनी त्यास विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पीडितेच्या मृत्यूपूर्वी आठ दिवस अगोदर आरोपीने तिला चॉकलेटचे आमिष दाखवून आपल्या दुचाकीवर बसवून नेले आणि घरात कोणी नसताना मोबाईलवरील अश्लील चित्रफीत पाहून तिच्यावर अत्याचार केले. त्यापूर्वी देखील त्याने तिच्यावर एक वेळेस अत्याचार केल्याची कबुली दिली

हे वाचलं का?