Beed : टाकीवरून उडी मारून मराठा तरूणाची आत्महत्या, आरक्षणासाठी संपवलं जीवन
बीड जिल्ह्यातील गिरवली येथे आणखी एका युवकाने पाण्याच्या टाकीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना शुक्रवार 27 ऑक्टोबरला रात्री 11.30 वाजता घडली आहे. शत्रुघ्न काशीद असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.
ADVERTISEMENT
Beed Youth Suicide for maratha Reservation : एकीकडे मराठा आरक्षणावरून (maratha Reservation) राजकीय वातावरण तापले असताना, दुसरीकडे राज्यात मराठा तरूणांकडून आत्महत्येसारखं टोकाचं पाऊलं उचललं जातेय. आता अशीच एक घटना समोर आली आहे. या घटनेत एका तरूणाने मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी टाकीवर चढून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. शत्रुघ्न काशीद असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. काशीद याच्या आत्महत्येने बीडमध्ये (Beed) हळहळ व्यक्त होतेय.(beed youth commit suicide for maratha reservation demand shatrughna kashid manoj jarange patil)
ADVERTISEMENT
बीड जिल्ह्यातील गिरवली येथे आणखी एका युवकाने पाण्याच्या टाकीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना शुक्रवार 27 ऑक्टोबरला रात्री 11.30 वाजता घडली आहे. शत्रुघ्न काशीद असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मराठा आरक्षण देण्याची मागणी आणि मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या समर्थनासाठी शत्रुघ्न शुक्रवारी रात्री पाण्याच्या टाकीवर चढला. तिथे शत्रुघ्न याने दोन तास आरक्षणाची मागणी करत घोषणाबाजी केली. यासोबतच जरांगे पाटील यांच्याशी बोलण्याचीही इच्छा व्यक्त केली. त्यानंतर जरांगे पाटील यांच्याशी त्याचे बोलणेही करून देण्यात आले होते.
हे ही वाचा : NCP : ‘…तर जयंत पाटलांनी महायुतीत शपथ घेतली असती’, अजित पवार गटाच्या नेत्याचा गौप्यस्फोट
शत्रुघ्नच्या या आंदोलनाची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली होती. यावेळी पोलिसांनी शत्रुघ्नची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, मात्र तो मागणीवर ठाम राहिला. अखेर त्याने टाकीवरून उडी मारून आपले जीवन संपवले.या घटनेनंतर परीसरात हळहळ व्यक्त होत आहे.
हे वाचलं का?
जरांगे पाटलांच मराठा समाजाला आवाहन
दरम्यान शुक्रवारी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर टीका केली होती. मराठ्यांची पोर मोठी होऊ नयेत, त्यांचं करिअर उद्ध्वस्त करण्यासाठी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी षडयंत्र रचल्याचा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर केला होता. सरकार 100 टक्के मराठा आरक्षणाचा विषय हाताळतील अशी आशा होती, पण त्यांना गोरगरीबांची गरज उरली नसल्याचीही टीका जरांगे पाटलांनी केली आहे.
मनोज जरांगे पाटलांनी यावेळी मराठा समाजाला आवाहन देखील केले. आजपासून ऐकानेही आत्महत्या करायची नाही, आता शांततेत लढून आरक्षण मिळवायचं. अजिबात कुणीही आत्महत्या करून मरायचं नाही. तुम्ही मेला तर माझ्यासोबत कोण लढणार, उद्यापासुन एकाने आत्महत्या करायची नाही, माझ्या खांद्याला खांदा लावून लढायचं, असे आवाहन जरांगे पाटलांनी मराठा तरूणांना केले.तसेच तुम्ही दोन चार दिवसात नाही दिले तरी आम्ही आरक्षण घेणारचं, तुम्ही कसे देत नाही आम्ही बघतो, असा दमच जरांगे पाटलांनी यावेळी भरला.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Devendra Fadnavis : ‘मी पुन्हा येईन’ व्हिडीओ भाजपने पुन्हा टाकला, कारण आलं समोर
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT