Bigg Boss 16 : शिव ठाकरे अमरावतीमध्ये; फटाके, ढोल अन् जंगी स्वागत…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Bigg Boss 16 : अमरावती : बिग बॉस -१६ पर्वाच्या ट्रॉफीवर रॅपर एम.सी.स्टॅनने नाव कोरलं. तर अमरावतीचा मराठमोळा शिव ठाकरे (Shiv Thackeray) स्पर्धेतील उपविजेता ठरला. सोशल मीडिया, सेलिब्रेटी या सगळ्यांचा बिग बॉसच्या बाहेर शिव ठाकरेला मोठा सपोर्ट मिळाला होता. पण अखेरीस एम. सी. स्टॅन हा या स्पर्धेचा विजेता ठरला. आता या शोची ट्रॉफी जरी त्याने जिंकली नसली तरी त्याने लोकांची मनं मात्र नक्कीच जिंकली असल्याच चित्र अमरावतीमध्ये पाहायला मिळालं. (Bigg Boss 16 | Shiv Thackeray received a warm welcome in Amravati)

ADVERTISEMENT

शिव ठाकरेचं नुकतचं अमरावतीमध्ये आगमन झालं. शिव येताच चाहत्यांनी त्याचा रस्ता अडवला होता. वाटेत फटाके वाजवून, ढोल-ताशाच्या गजरात लोकांनी नाचून आनंद साजरा केला. केक कापून, टाळ्या-शिट्ट्या वाजवत लाडक्या शिवचं अमरावतीकरांनी जंगी स्वागत केलं. एवढं प्रेम आणि एवढं प्रेमळ स्वागत पाहून शिवला आनंदाश्रू अनावर झाले होते. त्यांने हात जोडून सर्वांचे आभार मानले. चाहत्यांच प्रेम पाहुन शिव भावूक झालेला दिसला. 

हे वाचलं का?

जबरदस्त खेळून शिव ठाकरे हरला, कारण…

बिग बॉस 16 चा किताब पटकावण्यात शिव ठाकरे अपयशी ठरला. मराठमोळा शिव विजेता होईल, अशी आशा सर्वांना होती. मात्र अंतिम फेरीत एमसी स्टॅन भरघोस मतांनी विजय झाला. तर, शिव उपविजेता ठरला. शिव ठाकरेच्या पराभवामुळे नाराज झालेल्या चाहत्यांनी त्याची हार कशी झाली, असा प्रश्नही उपस्थित केला. पण शिव ठाकरे संपूर्ण सीझन एकटा खेळू शकला नाही, त्यामुळेच त्याची हार झाल्याचं म्हटलं जातं आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

शोमध्ये शिवचा स्वतःचा कोणताही स्टँड आणि गेम प्लॅन दिसला नाही. प्रेक्षकांना ही त्याच्यातील चूक वाटली. साजिद खान, अब्दु रोजिक असताना शिवला खूप कंटेंट मिळाला, पण ते बाहेर पडल्यानंतर शिव कमजोर दिसला. अंतिम फेरीपूर्वी शिवने आपला गेम प्लान दुरुस्त करणे अपेक्षित होते. शिव ज्यावेळी शोमध्ये आला तेव्हा ट्रॉफी जिंकण्याचा उत्साह वेगळाच होता. मंडळीचा भाग झाल्यानंतर हळूहळू शो जिंकण्याची जिद्द चाहत्यांना कमी होताना दिसली. परंतु, बिग बॉस 16 नंतर शिव ठाकरे प्रचंड प्रसिद्धीच्या झोतात आलेला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT