Ganpat Gaikwad : भाजप आमदाराने महेश गायकवाडांना कुठे कुठे मारल्या गोळ्या? Photo
भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर गोळ्या झाडल्या. जखमी झालेल्या महेश गायकवाड यांना गोळ्या कुठे कुठे लागल्या… पहा फोटो…
ADVERTISEMENT

Ganpat Gaikwad Mahesh Gaikwad : भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदेंच्या शिवसेनेच्या स्थानिक नेते महेश गायकवाड यांच्यावर गोळ्या झाडल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या जिल्ह्यात आणि चक्क पोलीस ठाण्यातच ही घटना घडल्याने महाराष्ट्र हादरला. यात महेश गायकवाड गंभीर जखमी असून, त्यांना कुठे कुठे गोळ्या लागल्या आहेत. याचा एक्सरे समोर आला आहे. (Where did MLA Ganpat Gaikwad shot at Mahesh Gaikwad)
पोलिसांच्या माहितीनुसार जमिनीचा वादातून ही घटना घडली आहे. शुक्रवारी रात्री 9.30 ते 10 वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. यात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी महेश गायकवाड जखमी झाले.
कुठे घडली घटना?
उल्हासनगरमधील हिल लाईन पोलीस ठाण्यात ही घटना घडली. पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या केबीनमध्येच भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर गोळ्या झाल्या.
हेही वाचा >> BJP आमदाराचा पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार, ‘तो’ वाद काय? Inside Story
जखमी झालेल्या महेश गायकवाड यांना ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना सहा गोळ्या लागल्या असून, अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.