Uttar Pradesh : हनिमूनच्या रोमान्सवेळी झाला कहर, नवरा-नवरीचा बेडवरच गेला जीव!

मुंबई तक

ADVERTISEMENT

bride and groom died together due heart attack honeymoon uttarpradesh romance
bride and groom died together due heart attack honeymoon uttarpradesh romance
social share
google news

Marathi News: लखनऊ: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) बहराइच शहरात एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. येथे दोन कुटुंबातील लग्नाचा आनंद एका क्षणात शोकसागरात विरून गेला आहे. त्याचं झालं असं की, एका 22 वर्षाच्या मुलाचं 20 वर्षांच्या मुलीशी नुकतंच लग्न झालं होतं. त्यामुळे दोन्ही घरात आनंदाचे वातावरण होतं. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी वधू-वर त्याच्या खोलीत गेले.. पण दुसऱ्या दिवशी बराच वेळ झाला तरी त्यांच्या खोलीतून कोणीही बाहेर आलं नाही. कडी वाजवूनही दोघांनीही दरवाजा काही उघडला नाही. तेव्हा नवऱ्या मुलाच्या लहान भावाने खिडकीतून खोलीत उडी मारली. जेव्हा त्याने आतील दृश्य पाहिलं तेव्हा त्याचा प्रचंड मोठा धक्का बसला… (bride and groom died together due heart attack honeymoon uttarpradesh romance)

ADVERTISEMENT

त्याने पाहिलं की, नवरा-नवरी हे त्यांच्या बेडवर अगदी निपचित अवस्थेत पडले होते. त्यामुळे नवरदेवाच्या भावाने पटकन दरवाज्याची कडी उघडली. त्यानंतर कुटुंबातील इतर लोक आत आले आणि त्यांनी दोघांनाही उठविण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांचे शरीर थंड पडले होते. त्यामुळे लग्न घरात एकच हाहाकार झाला. दोघांनाही तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. जिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. तसंच दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. त्यानंतर त्यांच्या मृत्यूचं जे कारण समोर आलं त्याने सर्वांनाच धक्का बसला.

शवविच्छेदन अहवालानुसार, दोघांना एकाच वेळी हृदयविकाराचा झटका आला होता. जेव्हा ही गोष्ट समोर आली तेव्हा अनेक सवाल उपस्थित केले जाऊ लागले. दोघांना एकाच वेळी हृदयविकाराचा झटका कसा काय आला? एवढ्या लहान वयात दोघांच्या बाबतीत असं कसं घडलं? असे सवाल आता विचारले जात आहे. याचबाबत aajtak.in ने हृदयरोग तज्ज्ञ आणि फोर्टिस रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. अजय कौल यांच्याकडून या मृत्यूच्या प्रकारावर सविस्तरपणे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.

हे वाचलं का?

काय कारण असू शकते?

डॉ. कौल म्हणतात की, कोरोना महामारीनंतर परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. आपण गेल्या काही दिवसांपासून अशा बातम्या वाचत असाल की, ज्यामध्ये लोकांना चालता-बोलता हृदयविकाराचा झटका येत आहे. हा सायलेंट हृदयविकाराचा झटका सर्व वयोगटातील लोकांना आपला बळी बनवत आहे.

हे ही वाचा >>  पोटची पोरगी जिवंत असतानाच माय-बाप घालणार तेरावं, असं काय घडलं?

डॉ. कौल म्हणतात की, यामागे कोरोना महामारी कशी असू शकते, हे समजून घेतले पाहिजे. कोरोना हा RNA व्हायरस आहे. अशा विषाणूंमुळे रक्ताच्या गुठळ्या होतात किंवा ब्लॉकेज होतात. ज्यामुळे हृदयातील रक्त प्रवाह असामान्य होतो आणि हृदयविकाराचा झटका येतो. एक डॉक्टर या नात्याने मी या घटनेकडे फक्त दोन विमाने अचानक कोसळतात त्या पद्धतीने पाहत आहे. ही घटना अत्यंत दुर्मिळ आहे. या घटनेला पूर्णपणे लैंगिक अॅक्टिव्हिटीशी जोडलं जाऊ शकत नाही.

ADVERTISEMENT

लैंगिक क्रिया ठरली मृत्यूचं कारण?

या प्रकरणात, कौटुंबिक इतिहास (Family History) प्रथम पाहिला पाहिजे. असे होऊ शकते की दोघांना आधीच हृदयाचा त्रास असू शकतो. ज्यांना हृदयाचा त्रास आहे अशा दोन व्यक्तींनी लग्न करणे ही काही मोठी गोष्ट नाही. पण तणाव, परिस्थिती आणि लैंगिक क्रिया या दरम्यान अचानक हृदयविकाराचा झटका आलेला असू शकतो. एकप्रकारे, दोन व्यक्तींना एकत्र हृदयविकाराचा झटका आला तर त्याला अंधश्रद्धेशी जोडले जाऊ शकते. पण कोरोना महामारीनंतर वाढलेल्या हृदयाच्या समस्यांशी त्याचा संबंध जोडूनच मी या प्रकरणाकडे पाहू शकतो. असं डॉ. कौल म्हणाले.

ADVERTISEMENT

छोट्या शहरांमध्येही तीच जीवनशैली

डॉ. कौल म्हणाले की, आजकाल मानसिक तणाव किंवा चिंता ही एक अतिशय सामान्य समस्या बनली आहे. याशिवाय, इंटरनेटची उपलब्धता आता प्रत्येक ग्रामीण आणि शहरी व्यक्तीकडे आहे. रात्रभर जागे राहणे, मोबाइलवर वेळ घालवणे, त्यावरचा ताण, फास्ट फूडचा वापर आणि झोप न लागणे यामुळे हृदयविकार झपाट्याने वाढत आहेत. वाईट जीवनशैली आता फक्त मोठ्या शहरांचा भाग राहिलेली नाही. या सर्व कारणांमुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता बळावली आहे.

टाळण्यासाठी काय करावे?

अशा घटना अनेकदा लोकांना घाबरतात. पण, आपल्या हृदयाविषयी अनेक गोष्टी आपल्याला माहित असाव्यात. उदाहरणार्थ, हृदय निरोगी ठेवण्यासाठी, आपल्याला आपली जीवनशैली पूर्णपणे शिस्तबद्ध आणि आपल्या नियंत्रणाखाली ठेवावी लागेल. तुमचे हृदय निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही या पद्धतीचा अवलंब करू शकता.

हे ही वाचा >> विवाहितेचा जंगलात सापडला मृतदेह! रक्तरंजित लव्हस्टोरी मोबाईलने…

हृदयासाठी मन निरोगी ठेवा: हृदय सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्हाला तुमचे मन तणावमुक्त ठेवावे लागेल. तुमची जीवनशैली नियंत्रित असेल तेव्हाच तुम्ही हे करू शकाल.

तुमच्या आहाराची काळजी घ्या: तुम्ही अन्नात काय घेत आहात, त्याचा तुमच्या हृदयावर कसा परिणाम होत आहे, हेही समजून घेतले पाहिजे. तेलकट अन्न, जास्त चरबीयुक्त पदार्थ तुमच्या हृदयावर ओझे बनतात. म्हणूनच हिरव्या भाज्या, व्हिटॅमिन-सी युक्त फळे इत्यादी आहारात घ्या.

व्यायाम करणं गरजेचं: तुमचे हृदय निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही भरपूर चाललं पाहिजे. निरोगी हृदयासाठी, आपण आपल्या जीवनशैलीत जास्तीत जास्त चालण्याला महत्त्व देणे आवश्यक आहे. याशिवाय, जर तुम्हाला काही असामान्य वाटत असेल तर हृदयाची तपासणी करणे सर्वात महत्वाचे आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT