Honeymoon ला गेलेल्या नववधूचा अत्यंत वेदनादायी मृत्यू, नवऱ्यासमोरच गेला जीव!
Honeymoon Couple: बहामासला हनिमूनसाठी गेलेली एक महिला तिच्या पतीसोबत पॅडलबोर्डिंग करत असताना पाण्यात शार्कने तिच्यावर जोरदार हल्ला केला. यामध्ये नववधूचा जागीच जीव गेला.
ADVERTISEMENT
Shark attack newlywed lady death: जगातील अनेक लोकांना साहसी खेळांची खूप आवड असते. पण हे साहस काही जणांसाठी जीवघेणं देखील ठरतं. बंजी जंपिंगपासून ते स्काय डायव्हिंगपर्यंत जवळजवळ सर्व साहसी खेळ धोकादायक असतात. वॉटर अॅडव्हेंचरबद्दल बोलायचे झाले तर पाण्यात राहणाऱ्या धोकादायक प्राण्यांच्या हल्ल्याचाही धोका असतो. (bride died tragically on honeymoon husband stood watching shark attack newlywed lady death )
ADVERTISEMENT
नुकताच बहामासमध्ये वॉटर स्पोर्ट्सदरम्यान एक भीषण अपघात झाला. येथे एका शार्कने हनिमूनला आलेल्या नवविवाहित महिलेचा जीव घेतला. ही महिला तिच्या लग्नाच्या एक दिवसानंतर बहामासमध्ये हनिमूनसाठी आली होती. येथील सँडल्स रिसॉर्टपासून थोड्या अंतरावर पॅडल बोर्डिंग करत होती त्याचवेळी तिच्यावर शार्कने अचानक हल्ला केला.
नेमकं घडलं तरी काय?
स्थानिक बातम्यांनुसार, हल्ल्याच्या वेळी पीडिता तिच्या पतीसोबत होती. पॅडलबोर्ड चालवत असताना एका शार्कने तिच्याचावर पाण्यात जोरदार हल्ला केला. व्हायरल झालेल्या फुटेजमध्ये असे दिसत आहे की, जेव्हा जीवरक्षकांनी महिलेवर हल्ला होताना पाहिले तेव्हा त्यांनी तात्काळ तिच्या दिशेने धाव घेतली. पण तोवर तिने जीव गमावला होता. यावेळी जीवरक्षक तिचे रक्ताळलेले, निर्जीव शरीर हे किनाऱ्यावर घेऊन आले आणि नंतर त्यांनी तिला रुग्णालयात नेले.
हे वाचलं का?
हे ही वाचा>> Pushpa चित्रपटातील अभिनेत्याला अटक, अभिनेत्रीसोबत नको ते केलं अन्…
रॉयल बहामियन पोलिस सार्जंट डेसिरी फर्ग्युसन यांनी पत्रकारांना सांगितले, ‘सकाळी 11.15 वाजता, पोलिसांना माहिती मिळाली की अमेरिकेतील एका महिला पर्यटकावर शार्कने हल्ला केला आहे. आमच्या सुरुवातीच्या अहवालानुसार, ती महिला वेस्टर्न न्यू प्रोविडेन्स येथील एका रिसॉर्टच्या मागे होती. त्यावेळी ती तिच्या पतीसोबत पॅडल बोर्डिंग करत होती. तेव्हाच अचानक तिच्यावर पाण्यातून बाहेर आलेल्या शार्कने हल्ला केला.’
हल्ल्यानंतर कर्तव्यावर असलेल्या जीवरक्षकाने जखमी झालेल्या महिलेला सुरक्षित स्थळी नेलं आणि तातडीने सीपीआर दिला. तिच्या उजव्या नितंब आणि तिच्या शरीराच्या उजव्या बाजूला गंभीर जखमा झाल्या होत्या. त्यामुळे उपचारादरम्यान महिलेला मृत घोषित करण्यात आले.
ADVERTISEMENT
हे ही वाचा>> Home Remedies for Snoring: घोरणं थांबवायच्या घरगुती आणि खूप सोप्या टिप्स
एका जेट स्की ऑपरेटरने नासउ गार्डियनला सांगितले की त्याने किनाऱ्यावरून हल्ला पाहिला. तो म्हणाला- हे माझ्यासाठी भीतीदायक होते कारण थोड्याच वेळापूर्वी मी त्यांना हसताना आणि पॅडल बोर्डिंगला जाताना पाहिले होते. मात्र काही वेळाने पॅडल बोर्डवर एकच मुलगा असल्याचे दिसून आले आणि हल्ल्यामुळे मुलगी पाण्यात पडली होती.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT