Viral Video: खतरनाक! सजलेल्या नवरीने स्पोर्ट्स बाईकवर ठोकली Dhoom, हायवेवर पुढे काय घडलं?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Bride Bike Riding Video Viral
Bride Shocking Video Viral
social share
google news

बातम्या हायलाइट

point

नवरीचा स्पोर्ट्स बाईक चालवण्याचा वेग पाहून तुम्हालाही आश्चर्यच वाटेल

point

नवरीच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी केला भन्नाट प्रतिक्रियांचा वर्षाव

point

हायवेवर स्पोर्ट्स बाईक चालवून धूम ठोकणाऱ्या नवरीचा व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल

Bride Ride Superbike Video Viral : पहिल्या जमान्यात नवरीला फुलांनी सजलेल्या पालखीत बसून मंडपात आणलं जायचं. परंतु, बदलत्या काळानुसार नवरीच्या एन्ट्रीचा अंदाजही बदलत आहे. लग्नमंडपात नवरीने तिच्या आवडीच्या गाण्यावर भन्नाट डान्स केल्याचं अनेक व्हायरल व्हिडीओंच्या माध्यमातून आपण पाहिलं आहे. पण सोशल मीडियावर नुकत्याच व्हायरल झालेल्या नवरीच्या एका व्हिडीओनं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. नटलेल्या नवरीने स्पोर्ट्स बाईक चालवून हायवेवर धूम ठोकल्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. नवरीचा हटके अंदाज आणि स्टाईल पाहून अनेकांच्या नजरा खिळल्या. (A video of the bride that went viral on social media has shocked everyone. The video of the crazy wife riding a sports bike and hitting the highway has gone viral)

नवरीच्या स्पोर्ट्स बाईकचा वेग पाहून तुम्हीही व्हाल थक्क

व्हायरल झालेल्या या व्हिडीओत नटलेली नवरी स्टायलिश स्पोर्ट्स बाईक चालवत असल्याचं पाहायला मिळत आहे. नवरीचा बाईक चालवण्याचा वेग पाहून हायवेवर प्रवास करणाऱ्या अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला. नवरीच्या गेटअपमध्ये असलेल्या या तरुणीनं स्पोर्ट्स बाईक चालवून हायवेवर जो थरार दाखवला, ते पाहून तुम्हीही थक्क झाल्याशिवाय राहणार नाहीत.

हे ही वाचा >> Ladki Bahin Yojana: खुशखबर! 10 ऑक्टोबर नाही; 'या' तारखेला जमा होणार 7500 रुपये

नवरीचा हा व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल झाल्याने नेटकऱ्यांनीही या व्हिडीओला प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे. एका यूजरने या व्हिडीओला कमेंट करत म्हटलं की, 'नवरीचा अनोखा अंदाज'. दुसरा यूजर म्हणाला, 'लग्नाची सर्वात वेगळी राईड'.व्हिडीओ पाहिल्यानंतर समजू शकता की, तरुणी फोटोशूट करण्यासाठी रस्त्यावर स्पोर्ट्सबाईक चालवत आहे. त्याचदरम्यान हायवेवरून प्रवास करणारे लोक तिला थम्सअप दाखवत आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

@itz_tuba44 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत कोट्यावधी लोकांनी पाहिलं आहे. तर 4 लाख 41 हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडीओला लाईक केलं आहे. या व्हिडीओला पाहिल्यानंतर एका यूजरने म्हटलं, असं वाटतंय वरात मागून येत आहे. अशाप्रकारे प्री-वेडिंग शूट कोण करतं? असा सवालही एका यूजरने उपस्थित केला.

हे ही वाचा >> Ladki Bahin Yojana: खुशखबर! 10 ऑक्टोबर नाही; 'या' तारखेला जमा होणार 7500 रुपये

    follow whatsapp

    ADVERTISEMENT