Ladki Bahin Yojana: खुशखबर! 10 ऑक्टोबर नाही; 'या' तारखेला जमा होणार 7500 रुपये

मुंबई तक

ADVERTISEMENT

ladki bahin yojana third installement date declare aditi tatakare mukhyamantri ladki bahin yojana scheme aditi tatkare ajit pawar eknath shinde ajit pawar
तिसरा हप्ता लवकरच येणार खात्यात
social share
google news

बातम्या हायलाइट

point

लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाची अपडेट आली समोर

point

चौथ्या हफ्त्याचे पैसे किती तारखेला खात्यात जमा होतील?

point

...तरच मिळतील लाडकी बहीण योजनेचे पैसे

Mazi Ladki Bahin Yojana 4th And 5th Installment Latest Update : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांच्या खात्यात पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या हफ्त्याचे पैसे जमा झाले आहेत. परंतु, लाडकी बहीण योजनेच्या चौथ्या आणि पाचव्या हफ्त्याची अनेक महिलांना प्रतिक्षा लागली आहे. 10 ऑक्टोबरपर्यंत या योजनेचा चौथा हफ्ता दिला जाणार आहे, अशी माहिती आहे. विशेष म्हणजे नोव्हेंबर महिन्याचा हफ्ताही अॅडवान्सम्ये जमा केला जणार असल्याचं सांगण्यात येतंय. अशातच माझी लाडकी बहीण योजनेच्या चौथ्या हफ्त्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे..

राज्यात जवळपास 2 कोटी महिलांच्या बँक खात्यात तिसऱ्या हफ्त्याचे पैसे जमा झाल्याचे सरकारकडून सांगितलं जात आहे. या योजनेतील अनेक पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात 1500 तर काही महिलांच्या खात्यात 4500 रुपये जमा करण्यात आले आहेत. परंतु, लाडकी बहीण योजनेचा चौथा हफ्ता कोणत्या तारखेला मिळणार? असा प्रश्न महिलांना पडला होता.

हे ही वाचा >> Suraj Chavan: कोण आहे सूरज चव्हाण? कसा ठरला 'Bigg Boss Marathi Season 5' चा विनर? वाचा INSIDE STORY

10 ऑक्टोबरपर्यंत महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता जमा होईल, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं होतं.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या मंगळवारी 8 ऑक्टोबरपासून लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांच्या खात्यात चौथ्या हफ्त्याची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरु होणार आहे. 10 ऑक्टोबरपर्यंत सर्व पात्र महिलांच्या खात्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन्ही महिन्यांची एकत्रित रक्कम जमा होईल.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

महिलांच्या खात्यात किती रुपये होतील जमा?

या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ज्या महिलांचे जुलै आणि महिन्याचे अर्ज मंजूर झाले होते, पण त्यांच्या खात्यात अजूनही योजनेचे पैसे जमा झाले नाहीत. अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या महिलांच्या खात्यात जुलै ते नोव्हेंबर असे एकूण 7500 रुपये जमा केले जाणार असल्याचं समोर आलं आहे. ज्या महिलांना सप्टेंबरच्या हफ्त्याची रक्कम मिळाली होती. त्यांना आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे एकूण 3000 रुपये मिळणार आहेत.

हे ही वाचा >> Ind vs Ban 1st T20: हार्दिक पंड्याने मोडला कोहलीचा 'विराट' विक्रम! पंड्या ठरला 'असा' कारनामा करणारा एकमेव फलंदाज

    follow whatsapp

    ADVERTISEMENT