भाऊजी-मेव्हणीचं लफडं आलं समोर! KISS केलेले व्हायरल फोटो बहिणीने पाहिले अन् नंतर घडलं सर्वात भयंकर..

Shocking Love Story Viral News :  बिहारच्या जमुईमध्ये काकी-पुतण्याच्या लव्ह स्टोरीचं धक्कादायक प्रकरण काही दिवसांपूर्वी समोर आलं होतं. हे प्रकरण ताजं असतानाच आता भाऊजी-मेव्हणीच्या लव्ह स्टोरीमुळे खळबळ उडाली आहे.

Shocking Viral Love Story
Shocking Viral Love Story
social share
google news

बातम्या हायलाइट

point

काय आहे संपूर्ण प्रकरण?

point

कशी झाली प्रेमकहाणीची सुरुवात?

point

फोटो व्हायरल झाल्यानंतर खुलासा झाला

Shocking Love Story Viral News :  बिहारच्या जमुईमध्ये काकी-पुतण्याच्या लव्ह स्टोरीचं धक्कादायक प्रकरण काही दिवसांपूर्वी समोर आलं होतं. हे प्रकरण ताजं असतानाच आता भाऊजी-मेव्हणीच्या लव्ह स्टोरीमुळे खळबळ उडाली आहे. हे दोघेही विवाहित असताना त्यांनी विवाहबाह्य संबंध सुरु केले. दोघांनीही ऐकमेकांच्या सोबत राहण्याचं ठरवलं. त्यानंतर या प्रकरणाला एक धक्कादायक वळण लागलं. प्रियकराच्या पत्नीनेही तिच्या चुलत बहिणीला जाऊ म्हणून स्वीकारलं आणि तिघेही आनंदात राहू लागले. पण नंतर असं काही घडलं ज्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

हे आगळंवेगळं प्रेमप्रकरण दरभंगा जिल्ह्यातील कमतौल पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलं. येथील एका गावात राहणारा संतोष दास (25) चं लग्न बनसारा गावातील नेहा देवी (19) 2019 मध्ये झालं होतं. लग्नानंतर त्यांच्यात सर्वकाही ठीक सुरु होतं आणि दोघांना दोन मुलंही होती. संतोष दास पुण्यात राहून मजुरी करायचा. यामुळे संतोषला नेहासाठी योग्य वेळा देता येत नव्हतं. त्यामुळे नेहाला खूप एकटेपणा जाणवत होता आणि ती माहेरी निघून गेली. याचदरम्यान नेहा तिच्या चुलत भाऊजींच्या संपर्कात आली आणि दोघांमध्ये जवळीक वाढली. 

हे ही वाचा >> Dahi Handi 2025: ठाण्यात विश्वविक्रम, 10 थरांची कडक सलामी... 'कोकण नगर' गोविंदा पथकाने रचला इतिहास

कशी झाली प्रेमकहाणीची सुरुवात?

पती घरी नसल्याने नेहा फावळा वेळ घालवण्यासाठी नेहमीच माहेरी राहू लागली. याचदरम्यान नेहा तिच्या भाऊजीच्या संपर्कात आली. प्रवेश दासचं लग्न पूजासोबत झालं होतं. नेहा आणि पूजा दोघी चुलत बहिणी आहेत. नेहा आणि प्रवेश यांच्यात प्रेमसंबंध सुरु झाले आणि ते ऐकमेकांना लपून छपून भेटू लागले. 

फोटो व्हायरल झाल्यानंतर खुलासा झाला

जवळपास तीन वर्षांपूर्वी नेहाने माहेरचं घर सोडून प्रेवशला भेटायला गेली. याचदरम्यान दोघांचे काही रोमॅन्टिक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. यामुळे त्यांचं प्रेमप्रकरण समोर आलं. नेहाचे फोटो तिच्या सासरच्या मंडळींनी आणि संतोषनीही पाहिले. त्यानंतर संतोषची सटकली अन् तो नेहाला भेटायला त्याच्या सासरी बनसाराला पोहोचला पण नेहा तिथे नव्हती. 

हे ही वाचा >> Mumbai Rain: आज दहीहंडीच्या दिवशीच पाऊस घालणार मुंबईत धुमाकूळ! ‘या’ भागात साचणार पाणी

जेव्हा संतोष दासला त्याच्या सासरी नेहा भेटली नाही. नेहा थलवाडा येथील सिनुआरा गावात प्रियकर प्रवेश सोबत राहत असल्याची खबर संतोषला मिळाली. संतोष तिथे पोहोचला आणि नेहाला घरी येण्यासाठी विनंती केली. पण नेहाने त्याला स्पष्ट नकार दिला. त्याने स्पष्ट म्हटलं की, मला संतोषसोबत राहायचं नाही. ते मला वेळ देत नाहीत आणि माझी काळजीसुद्धा घेत नाहीत.

मला माझ्या मुलांसह प्रवेशसोबत राहायचं आहे. जेव्हा संतोषने नेहाच्या बहिणीला याबाबत विचारलं, तेव्हा तिनेही धक्कादायक उत्तर दिलं. ती म्हणाली, माझी बहीण माझ्यासोबत आणि पतीसोबत माझ्या घरी राहील. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांत कोणतीही तक्रार नोंदवण्यात आली नाहीय. परंतु, या प्रेमप्रकरणाची सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगलीय. 

हे वाचलं का?

    follow whatsapp