Chandigarh Mayor : विनोद तावडेंनी रात्रीतून बदलला 'गेम'; आपचा 'करेक्ट कार्यक्रम' !

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

चंदीगड महापालिकेतील सत्ता राखण्यासाठी भाजपने मोठा राजकीय गेम केला आहे.
newly appointed Mayor of Chandigarh Manoj Sonkar has resigned from his post.
social share
google news

News about Chandigarh Mayor : चंदीगड महापौर निवडणुकीचा मुद्दा सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर भाजपने मोठा डाव टाकला. महापौर निवडणुकीत खाडाखोड करून मते बाद ठरवल्याच्या प्रकरणावर सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढले. त्यानंतर भाजपचे नेते विनोद तावडे यांनी मोठी खेळी करत चित्रच बदलून टाकले. एका रात्रीत चंदीगड महापालिकेतील गणित बदललं असून, भाजपने आप ला मोठा झटका दिला आहे. या राजकीय खेळीमुळे तावडेंचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. (BJP Mayor of Chandigarh Manoj Sonkar has resigned from his post.)

अनेक दिवस लांबलेल्या चंदीगड महापौर पदाची निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत आम आदमी पार्टी आणि काँग्रेस एकत्र आल्याने त्यांचा महापौर निवडून येईल, अशी स्पष्ट स्थिती होती. मात्र निवडणूक अधिकाऱ्यांने आप-काँग्रेसची आठ मते बाद ठरवली. त्यामुळे भाजपला बहुमत मिळून भाजपचे मनोज सोनकर महापौर झाले. 

सुप्रीम कोर्टाने निवडणूक अधिकाऱ्याला झापले

चंदीगड महापौर निवडणुकीत झालेल्या या प्रकारानंतर सुप्रीम कोर्टात धाव घेण्यात आली होती. सुप्रीम कोर्टाने निवडणुकीचे व्हिडीओ बघून संताप व्यक्त केला होता. ही लोकशाहीची हत्या आहे, असे सांगत सुप्रीम कोर्टाने निवडणूक अधिकाऱ्याला हजर राहण्याचे आदेश दिले. या प्रकरणाची सोमवारी (19 फेब्रुवारी) सुनावणी आहे. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

सोनकरांचा राजीनामा, आपचे तीन नगरसेवक भाजपमध्ये

सुप्रीम कोर्टातील सुनावणी पूर्वीच दोन मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. भाजपने नंबर गेम जुळवून आणण्यासाठी आम आदमी पक्षाला मोठा झटका दिला आहे. एकीकडे नवनिर्वाचित महापौर मनोज सोनकर यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. दुसरीकडे सोनकरांच्या राजीनाम्यानंतर आम आदमी पक्षाचे तीन नगरसेवक भाजपमध्ये दाखल झाले आहे. 

भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी यांची ट्विट करून माहिती दिली. त्यांच्या उपस्थितीत तीन नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. चंदीगड महापौर निवडणुकीवेळीही विनोद तावडे यांचं नाव चर्चेत आलं होतं. आता आकड्यांचं गणित जुळवून आणण्यात भाजपला यश आले आहे. विनोद तावडे यांनी रात्रीतून खेळी करत डाव उलटून टाकला आहे. 

ADVERTISEMENT

चंदीगड महापालिकेतील गणित बदललं

आम आदमी पक्षाच्या तीन नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने आता राजकीय बलाबल बदलले आहे. आता भाजपच्या नगरसेवकांची संख्या 17 झाली आहे. त्याचबरोबर भाजपकडे एक खासदाराचंही मत आहे. शिरोमणी अकाली दलाच्या एका नगरसेवकानेही भाजपला मत दिले होते. त्यामुळे भाजपकडील एकूण 19 वर पोहोचली आहेत. 

ADVERTISEMENT

दुसरीकडे आम आदमी पार्टी आणि काँग्रेसची मते 20 वरून 17 वर आली आहेत. त्यात 7 मते काँग्रेसची आहेत, तर आपची 10 मते आहेत. चंदीगड महापालिकेत नगरसेवकांची एकूण संख्या 35 आहे. महापौर पदाच्या निवडणुकीसाठी बहुमताचा आकडा 19 आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT