Maratha Reservation : भुजबळांचा जरांगेंवर जोरदार हल्ला, ‘धनगर, नाभिक समाजाच्या आरक्षणावर डल्ला मारतोय’

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

chhagan bhujbal criticize manoj jarange patil on marathar reservation obc meeting
chhagan bhujbal criticize manoj jarange patil on marathar reservation obc meeting
social share
google news

Chhagan Bhujbal criticize Manoj jarange patil : मराठा आरक्षणावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal)  यांच्यातील शाब्दीक वाद सुरुच आहेत. त्यात आता ‘धनगर आणि नाभिक समाजाच्या आरक्षणावर डल्ला मारतोय’, अशी गंभीर टीका छगन भुजबळांनी मनोज जरांगे पाटलांवर केली. (chhagan bhujbal criticize manoj jarange patil on marathar reservation obc meeting)

ADVERTISEMENT

छगन भुजबळ प्रसिद्धी माध्यमांशी बोलत होते. यावेळी जरांगेंनी भुजबळांना ग्रामपंचायत निवडणूक लढवू दाखवावी असे आव्हान दिले होते. यावर भुजबळ म्हणाले, ‘जरांगेंना सांगा, तु अगोदर ग्रामपंचायतीला उभा राहा’. ‘छगन भुजबळ ग्रामपंचायतीत नाही, तर मुंबईच्या महापालिकेत 25 वर्षे निवडून आलाय. दोन वेळा महापौर आणि दोन वेळा आमदार त्यांच्यानंतर चार वेळा येवल्याचा आमदार झाला.’ ‘तु मला सांगायची काय गरज नाही ग्रामपंचायती वगैरे. तु अगोदर नीट उभा राहा, असे प्रत्युत्तर जरांगेंना दिले आहे.

हे ही वाचा : Shiv Sena : आधी श्रीकांत शिंदे, आता एकनाथ शिंदेंचा फोटो; संजय राऊतांनी बापलेकाला घेरलं

हा (जरांगे पाटील) आमच्यात फुट पाडण्याचा प्रयत्न करतोय. कधी म्हणतो धनगरांच्या बाजूने, कधी म्हणतो नाभिकांच्या बाजूने, तु आमच्या धनगर समाज आणि नाभिक समाजाच्या आरक्षणावर डल्ला मारायचे काम तु आणि तुझे सहकारी करतायत,अशी टीका भुजबळांनी जरांगेंवर केली. तसेच तु ओबीसी समाजातून आरक्षण घेण्याची मागणी मागे घे, तुझे उपकार आम्ही मान्य करू, असे देखील भुजबळ म्हणाले आहेत.

हे वाचलं का?

नवीन पक्ष काढणार का?

ओबीसी नवीन पक्ष राजकीय पक्ष काढणार असल्याचे बोलले जात आहे. यावर छगन भुजबळ म्हणाले, नवीन पक्ष काढण्याचा विचार केला तर ही सगळी मंडळी काय करणार? त्याच्यामुळे मतप्रवाह वाहायला सुरुवात होईल आणि जे ओबीसी एकत्र येतायत त्याच्यातही खंड पडायला सुरूवात होईल. त्यामुळे याचा देखील विचार करायला हवा असे छगन भुजबळ यांनी सांगितले.

हे ही वाचा : Mufti Salman Azhari : अजहरींचे काय बोलले की, गुजरात पोलिसांनी केली अटक?

आज आमचा सर्व फोकस पक्षाचे सहकार्य घेऊन, सरकारमधील ओबीसी नेत्यांना घेऊन, ओबीसींवरच आक्रमण थांबलं पाहिजे. यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आणि सर्वच पक्षातील आमदार, नेत्यांची ताकद ओबीसी नेत्यांच्या बाजूने उभी करणे गरजेचे आहे. यासाठी आपल्याबरोबर जे आमदार येतातत त्यांना सोबत घेऊन लढाई पुढे न्यायची आहे, असे भुजबळांनी सांगितले.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT