BEED: लग्नाची सुपारी आचारी, मंडपवाल्याला चांगलीच भोवली; पैसे तर मिळालेच नाही पण..

मुंबई तक

ADVERTISEMENT

child marriage beed bjp girls parents police crime bride groom family
child marriage beed bjp girls parents police crime bride groom family
social share
google news

बीड: बालविवाह (Child Marriage) करणे कायद्याने गुन्हा असताना देखील बीड (Beed) जिल्ह्यात बालविवाह मोठ्या प्रमाणात होताना दिसून येत आहेत. तर प्रशासनाकडून बालविवाह रोखण्यासाठी जनजागृती करण्यात येत असतानाच बीड जिल्हयातल्या वेताळवाडी मध्ये 2 जून रोजी 14 वर्षीय मुलीचा विवाह होत असल्याची माहिती प्रशासकीय अधिकाऱ्यांना मिळाली. ज्यानंतर तब्बल 32 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (child marriage beed bjp girls parents police crime bride groom family)

या संदर्भातील घटनेची माहिती मिळताच अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन बालविवाह रोखून मुलीच्या व मुलाच्या माता-पित्यासह भटजी, आचारी, वाजंत्री, फोटोग्राफर, मंडपवाला आणि भाजपाच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्षासह 32 नातेवाईकांवर आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ज्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

नेमकं प्रकरण काय?

आष्टी तालुक्यातील वेताळवाडी येथील एका 14 वर्षीय मुलीचा विवाह 2 जून रोजी होत असल्याची माहिती प्रशासकीय अधिकाऱ्यांना झाल्यानंतर सदरील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन हा बालविवाह रोखला.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Bhagirath Bhalke : शरद पवारांचा सोलापुरातील नेता ‘केसीआर’ यांनी फोडला

या प्रकरणी ग्रामसेवक शंकर मुरलीधर मेहेत्रे यांच्या फिर्यादीवरून भास्कर आश्रुबा पालवे (मुलीचे वडील), सिंधूबाई भास्कर पालवे (मुलीची आई), आसरू रघू पालवे (मुलीचे आजोबा), केसराबाई आसरू पालवे (मुलीची आजी), शिवाजी आश्रुबा पालवे (चुलते), संगिता शिवाजी पालवे (चुलती), चंद्रकांत राघू पालवे (चुलते), साखरबाई चंद्रकांत पालवे, भीमराव पालवे, चतुराबाई भिमराव पालवे, विठ्ठल पालवे, परमेश्वर पालवे, युवराज पालवे, सुभाष पालवे, एकनाथ पालवे, शंकर पालवे, लहू पालवे, अशोक वनवे, रामराव मारुती वनवे, विजयकुमार कारभारी गोल्हार, राहुल सुभाष काकडे, संदीप गर्जे ( नवरदेव, रा. सुर्डी ता. आष्टी), अर्जुन बाबू गर्जे (नवरदेवाचे वडील, रा. वेताळवाडी), पवार (फोटोग्राफर) यासह अन्य अशा 32 जणांविरोधात आष्टी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे ही वाचा >> सुसंस्कृत पुणे हादरलं, अल्पवयीन मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत बायकोने पतीचा घरातच काढला काटा

दरम्यान, या लग्नाला चक्क भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजयकुमार गोल्हार यांच्या उपस्थितीत होती. त्यामुळे आता त्यांच्याविरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यामुळे या घटनेने खळबळ उडाली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT