PN Patil : निष्ठावंत हरपला! काँग्रेसचे आमदार पाटील यांचे उपचारादरम्यान निधन

मुंबई तक

ADVERTISEMENT

आमदार पी.एन. पाटील यांचे उपचारादरम्यान निधन झाले.
काँग्रेसचे करवीरचे आमदार पी.एन. पाटील.
social share
google news

PN Patil Latest News : काँग्रेस विचारधारेशी निष्ठा ठेवून राजकारण करणारे आमदार पी.एन. पाटील यांचे गुरुवारी (२१ मे) पहाटे निधन झाले. पाटील यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. डॉक्टरांनी प्रयत्नांची शर्थ केली.  पण, पाटील यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. (Congress MLA PN Patil Died while treatment)

काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष आणि करवीर विधानसभेचे आमदार पी.एन. पाटील यांची प्राणज्योत मालवली. ते ७१ वर्षाचे होते. गांधी घराण्याचे विश्वासू अशी त्यांची ओळख होती. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात ते गेल्या काही महिन्यापासून सतत फिरतीवर होते. मतदान पार पडल्यानंतर त्यांना त्रास जाणवू लागला होता.

ब्रश करताना कोसळले अन्...

रविवारी म्हणजे १९ मे रोजी ते घरी होते. सकाळी साडे आठ वाजता ब्रश करत असताना ते खाली पडले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. एमआरआय करण्यात आले. त्यात पाटील यांच्या मेंदूत रक्तस्राव झाल्याचे आढळून आले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हेही वाचा >> 'संधी असेल तर पुरेपूर फायदा घ्यायचा...', पवारांचा सत्ता मिळविण्याचा मास्टर प्लॅन! 

त्यानंतर पाटील यांना तातडीने आधार रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्यांच्यावर शस्त्रक्रिया ही करण्यात आली. मात्र, मेंदूची सूज कायम होती. त्यांच्यावर गेल्या चार दिवसांपासून उपचार सुरू होते, पण गुरूवारी (२१ मे) पहाटे ६ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. 

कार्यकर्त्यांना शोक अनावर

पाटील यांच्या निधनाचे कळताच त्यांच्या कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले. त्यांच्या निधनाने काँग्रेसची हानी झाली असून, काँग्रेस नेत्यांनीही त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> भाजपचा होणार मोठा विजय! अमेरिकेतील विश्लेषकाने सांगितला आकडा 

काँग्रेस नेते सतेज पाटील म्हणाले, "काँग्रेसचे निष्ठावंत, कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष, करवीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार पी. एन. पाटील यांच्या निधनाची वार्ता अत्यंत दुःखद आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. आम्ही त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत. त्यांच्यासारख्या निष्ठावंत नेत्याच्या निधनामुळे काँग्रेसचे मोठे नुकसान झाले आहे. ईश्वर त्यांना सद्गती देवो व कुटुंबियांना दुःखातून सावरण्याचे बळ देवो", अशा भावना पाटील यांनी व्यक्त केल्या.

ADVERTISEMENT

पी.एन. पाटील यांच्या पत्नी जयादेवी यांचे २०१२ मध्ये निधन झाले होते. त्यांच्या पश्चात मुलगा राजेश, राहुल, विवाहित मुलगी टीना, बहीण दमयंती मोहिते यांच्यासह मोठा परिवार आहे. 

सकाळी १० वाजता कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात अत्यंदर्शनासाठी त्यांचे पार्थिव ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर ११ वाजता करवीर तालुक्यातील सडोली खालसा गावात पार्थिव नेण्यात येणार असून, दुपारी १ वाजात अत्यंविधी करण्यात येणार आहे. 

 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT