Dahi Handi 2023 : ठाण्यात जय जवानची नऊ थरांची सलामी, दहा थर रचून करणार विक्रम ?
Dahi Handi 2023 jai jaiwan Govinda Pathak : ठाण्यातील मनसेच्या दहीहंडीत जय जवान या पथकाने नऊ थर रचले आहेत. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने जय जवान पथकाने हे थर रचले होते. हे थर रूचन जय जवान पथकाने त्यांचा नऊ थरांचा विक्रम कायम ठेवला आहे. य़ा थरानंतर आता जय जवान पथक 10 थरांसाठी प्रयत्न करणार आहे. जर जय […]
ADVERTISEMENT
Dahi Handi 2023 jai jaiwan Govinda Pathak : ठाण्यातील मनसेच्या दहीहंडीत जय जवान या पथकाने नऊ थर रचले आहेत. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने जय जवान पथकाने हे थर रचले होते. हे थर रूचन जय जवान पथकाने त्यांचा नऊ थरांचा विक्रम कायम ठेवला आहे. य़ा थरानंतर आता जय जवान पथक 10 थरांसाठी प्रयत्न करणार आहे. जर जय जवानने 10 थर लावले तर हा मोठा विक्रम ठरणार आहे. (dahi handi 2023 jai jawan created nine layers in thane now waiting for the record of ten layers)
ADVERTISEMENT
ठाण्यात मनसेच्या दहीहंडीत जय जवान पथकाने नऊ थरांची सलामी दिली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे ही जय जवान गोविंदा पथकाची ही कामगिरी बघायला उपस्थित होते. यावेळी जय जवान पथकारे राज ठाकरेंसमोरच हे थर रचले होते. यावेळी मनसेचे आमदार राजू पाटील, बाळा नांदगावर यांसह अनेक नेते उपस्थित होते.
जय जवान गोविंदा पथकाने ठाण्याच्या या दहीहंडीत अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने हे थर रचले होते. या थरानंतर देखील ते व्यवस्थितरीत्या खाली उतरले होते.अनेक महिन्याच्या सरावामुळे जय जवान हे थर रचत असते. आतापर्यंत जय जवान गोविंदा पथकाने अनेकदा नऊ थर रचले आहेत. मात्र दहा थर रचण्यात अद्याप तरी यश आले नाही नव्हते. त्यामुळे या दहीहंडीत तर जय जवान गोविंदा पथक दहा थर रचणार का याकडे गोविंदा प्रेमींचे लक्ष लागले आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT