AIIMS: बाप रे! चिमुकल्याच्या फुफ्फुसात अडकली सुई, डॉक्टरांचे प्रयत्न अन्…
ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) च्या डॉक्टरांनी एक कौतुकास्पद कामगिरी केली आहे. त्यांनी चुंबकाच्या सहाय्याने सात वर्षांच्या मुलाच्या डाव्या फुफ्फुसात अडकलेली सुई यशस्वीरित्या काढली आहे.
ADVERTISEMENT
Delhi AIIMS Medical News : ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) च्या डॉक्टरांनी एक कौतुकास्पद कामगिरी केली आहे. त्यांनी चुंबकाच्या सहाय्याने सात वर्षांच्या मुलाच्या डाव्या फुफ्फुसात अडकलेली सुई यशस्वीरित्या काढली आहे. रुग्णालयाने शनिवारी (4 नोव्हेंबर) याबाबत माहिती दिली. रूग्णालयाने सांगितले की, बालरोग शस्त्रक्रिया विभागाच्या टीमने फुफ्फुसात अडकलेली चार सेंटीमीटर सुई काढण्यासाठी एक जटिल एंडोस्कोपिक प्रक्रिया वापरली. हेमोप्टायसिस (खोकल्याबरोबर रक्तस्त्राव) झाल्याच्या तक्रारीनंतर मुलाला बुधवारी (1 नोव्हेंबर) गंभीर अवस्थेत एम्समध्ये दाखल करण्यात आले. (Delhi AIIMS Medical News needle stuck in child lung aiims doctors did miracle)
ADVERTISEMENT
फुफ्फुसात आढळली लांबलचक शिवणकामाची सुई
बालरोग शस्त्रक्रिया विभागाचे अतिरिक्त प्राध्यापक डॉ. विशेष जैन यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेडिओलॉजिकल तपासणीत मुलाच्या डाव्या फुफ्फुसात शिलाई मशीनची लांबलचक सुई अडकल्याचे दिसून आले. डॉ. जैन यांनी एका ओळखीच्या व्यक्तीमार्फत त्याच दिवशी संध्याकाळी चांदणी चौक बाजारातून चुंबक खरेदी करण्याची व्यवस्था केली. “चार मिलिमीटर रुंद आणि 1.5 मिलिमीटर जाड असलेले चुंबक या कामासाठी योग्य साधन होते,” असं जैन म्हणाले.
वाचा : Gram Panchayat Election 2023 LIVE : बीड जिल्ह्यात 18 गावांचा ग्रामपंचायत निवडणूकीवर बहिष्कार
धोका टाळत डॉक्टरांनी केली कौतुकास्पद कामगिरी!
बालरोग शस्त्रक्रिया विभागाचे अतिरिक्त प्राध्यापक डॉ. देवेंद्र कुमार यादव म्हणाले की, ‘सुई फुफ्फुसाच्या आत इतकी खोलवर रूतलेली होती की, इतर सर्व पद्धती नाकाम ठरल्या. ते म्हणाले की सुई सुरक्षितपणे काढण्यासाठी नाविन्यपूर्ण उपाय शोधण्याच्या उद्देशाने डॉक्टरांच्या टीमने विस्तृत चर्चा केली. डॉ. जैन म्हणाले, “श्वासनलिकेला कोणताही धोका टाळून चुंबकाला सुईच्या स्थानावर नेणे हा प्राथमिक उद्देश होता.’
हे वाचलं का?
वाचा : गजानन कीर्तिकरांचा पत्ता कट! रामदास कदमांनी जाहीर केलं उमेदवाराचं नाव
डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश, पण सापडले फक्त सुईचे टोक
टीमने एक विशेष उपकरण तयार केले ज्यामध्ये रबर बँड आणि धागा वापरून चुंबक सुरक्षितपणे जोडला गेला.” डॉ. यादव यांच्या मते, टीमने डाव्या फुफ्फुसात सुई शोधण्यासाठी लेसरचा वापर केला. श्वासनलिकेची एन्डोस्कोपी सुरू करण्यात आली आणि टीमला सुईचं फक्त टोक सापडली, जे फुफ्फुसात खोलवर अडकले होते. या चुंबक यंत्राच्या सहाय्याने सुई यशस्वीपणे काढण्यात आल्याचे डॉ.जैन यांनी सांगितले. एम्सच्या म्हणण्यानुसार, सुई मुलाच्या फुफ्फुसात कशी पोहोचली याबद्दल कुटुंबीय कोणतीही माहिती देऊ शकले नाहीत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT