‘ते ऐकायला तयार नव्हते’, देवेंद्र फडणवीसांनी सांगितली वारकरी लाठीचार्जची स्टोरी

भागवत हिरेकर

आळंदीमध्ये वारकऱ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज करण्याचा प्रकार जून महिन्यात घडला. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत उत्तर देताना हा आरोप फेटाळून लावला.

ADVERTISEMENT

devendra fadnavis statement on lathicharge on varkari in alandi
devendra fadnavis statement on lathicharge on varkari in alandi
social share
google news

Devendra Fadnavis News : यंदा आळंदीत वारकरी आणि पोलिसांत झटापट झाल्याचा प्रकार घडला. हा मुद्दा विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात उपस्थित करण्यात आला. यावर उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले. देवेंद्र फडणवीसांनी लाठीमार झाल्याचा आरोप फेटाळून लावला. आळंदीत नेमकं काय घडलं, याबद्दलचा वृत्तांत त्यांनी सभागृहात सांगितला.

विधान परिषदेत उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “एक मुद्दा आला की पहिल्यांदा तुम्ही वारकऱ्यांवर लाठीचार्ज केला. पण, ही वस्तुस्थिती नाहीये. महाराष्ट्रात कुठलंही सरकार आलं तरी वारकऱ्यांवर लाठीचार्ज सरकार कधी करत नसतं. ती करायची वेळही येऊ नये.”

वाचा >> ‘सॉरी, हॅप्पी बर्थडे पापा…’; तोंडावर पॉलिथीन… हातात दोरी, सुसाईड नोटने डोळ्यात पाणी

फडणवीस पुढे म्हणाले की, “मी आपल्याला एवढंच सांगतो की, मागच्या वर्षी मंदिरात आपण ज्यावेळेस सगळ्यांना प्रवेश दिला, त्यावेळी तिथे चेंगराचेंगरी झाली होती. काही महिलांच्या अंगावर महिला पडल्या आणि अडचण झाली. मग ते झाल्यानंतर या वर्षी त्याचं नियोजन कसं करायचं, यासंदर्भात एक बैठक झाली. ज्यामध्ये वरिष्ठ पोलीस अधिकारी, आळंदी शहरातील प्रतिष्ठित ग्रामस्थ, 56 दिंड्यांचे प्रमुख आणि मंदिराचे विश्वस्त, अशी बैठक झाली.”

56 दिंड्यांना प्रत्येकी 75 पास

या बैठकीत झालेल्या निर्णयाबद्दल बोलताना फडणवीस यांनी सांगितले की, “त्या बैठकीत असं सांगण्यात आलं की, 56 दिंड्या ज्या आहेत, प्रत्ये 75 पास द्यायचे. त्यांना पहिल्यांदा प्रवेश द्यायचा. त्यानंतर मग उर्वरित प्रवेश सुरू करायचे, ते निघून गेल्यानंतर. असा एकत्रितपणे निर्णय झाला. त्यानंतर त्याप्रकारे 56 दिंड्यांचे 75-75 लोकं त्या भागात आतमध्ये असताना तिथे जे बॅरिकेट्स लावले होते. तिथे जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे आजी-माजी विद्यार्थी 300-400 संख्येने जमा झाले. त्यांनी आग्रह सुरू केला की आम्हालाही दर्शनालाही जाऊ द्या. त्यांना समजावण्याचा प्रयत्न झाला.”

हे वाचलं का?

    follow whatsapp