Maratha Protest: जाळपोळ भोवणार; फडणवीस म्हणाले, “त्या आंदोलकांवर जीवे…”

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

Maratha Protest for Maratha reservation : Devendra fadnavis said government will take strict against against who torched houses
Maratha Protest for Maratha reservation : Devendra fadnavis said government will take strict against against who torched houses
social share
google news

Devendra Fadnavis on violence in Maharashtra for reservation : शांततेत सुरू असलेल्या मराठा आंदोलनाला काही ठिकाणी गालबोट लागलं. विशेषतः बीडसह मराठवाड्यातील काही जिल्ह्यात हिंसेचा भडका उडाला. आमदार, लोकप्रतिनिधींची घरं, कार्यालये आणि वाहने जाळण्यात आली. या घटनांची गंभीर दखल राज्य सरकारने घेतली असून, त्यांच्या विरुद्ध थेट हत्येचा प्रयत्न केल्याचे गुन्हे दाखले केले जाणार आहे. याबद्दल राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली. (Devendra Fadnavis First Reaction on violence rose in Maharashtra)

ADVERTISEMENT

मुंबईत माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मराठा आरक्षणाच्या संदर्भात जे काही आंदोलन चाललेलं आहे. त्यासंदर्भात राज्य सरकार सकारात्मकेतेने पाऊल उचलत आहे. मुख्यमंत्र्यांनी स्वतः आरक्षणासंदर्भात वचन दिलं आहे. त्यानुसार राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात पूर्णपणे वचनबद्ध आहे.”

फडणवीस झाले नाराज; म्हणाले, “हे अतिशय…”

जाळपोळीच्या घटनांवर देवेंद्र फडणवीसांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, “मंत्रिमंडळातील निर्णयही मंत्र्यांनी सांगितले आहेत. पण, याचवेळी लोक या आंदोलनाचा फायदा घेऊन हिंसा करण्याचा प्रयत्न करताहेत. विशेषतः ज्या प्रकारे काल (३० ऑक्टोबर) काही लोकांनी लोकप्रतिनिधींची घरं जाळ, काही विशिष्ट समाजाच्या लोकांना टार्गेट कर, काही लोकांचे हॉटेल, दवाखाने जाळ, प्रतिष्ठाणे जाळं… अशा प्रकारची कारवाई केली आहे. हे अत्यंत चुकीचे आहे”, अशी चिंता फडणवीसांनी व्यक्त केली.

हे वाचलं का?

जाळपोळ करणाऱ्यांची ओळख पटली

याच मुद्द्यावर पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, “याची अतिशय गांभीर्याने दखल राज्य सरकारने घेतली आहे. अशा सगळ्यांवर लोकांवर पोलीस आणि गृह विभाग कडक कारवाई करेल. विशेषतः लोक घरात असताना घरं जाळण्याचा जो प्रयत्न झालेला आहे, त्याचे सगळे व्हिडीओ, फूटेजस् मिळालेले आहेत. ५०-५५ लोकांची ओळखही पटली आहे. उरलेल्यांची ओळख पटवली जात आहे.”

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Maratha Reservation : ‘ही माणसं फार निष्ठुर आहेत..’ राज ठाकरेंनी मनोज जरांगेंना पाठवलेलं पत्र जसंच्या तसं

“या सगळ्या लोकांना पोलीस ३०७ च्या अंतर्गत म्हणजे जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या अंतर्गत त्यांच्यावर कारवाई करणार आहेत. अशा प्रकारे कुणाला मारून टाकण्याचा प्रयत्न, कुणाची प्रॉपर्टी जाळण्याचा प्रयत्न हा जर होत असेल, तर मला असं वाटतं की, पोलीस बघ्याची भूमिका घेणार नाही. अतिशय कडक कारवाई करण्यात येणार आहे”, असा स्पष्ट इशारा फडणवीसांनी दिला आहे.

ADVERTISEMENT

तोपर्यंत पोलिसांची कारवाई सुरुच राहील, फडणवीसांचा इशारा

“जिथे शांततापूर्ण आंदोलनं सुरू आहेत, त्यांच्यावर कुठलीही कारवाई करण्यात येणार नाही. शांतता पूर्ण आंदोलन करण्याचा सगळ्यांना अधिकार आहे. त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं जाईल. मात्र, हिंसेला कुठेही धारा दिला जाणार नाही. आवश्यकतेप्रमाणे अधिक बळ तैनात करण्यात आलं आहे. जोपर्यंत शांतता होत नाही आणि अशा शक्तींना पकडलं जात नाही, तोपर्यंत पोलिसांची कारवाई सुरू राहील”, असे फडणवीस माध्यमांशी बोलताना म्हणाले.

हे ही वाचा >> Maratha Reservation : ठाकरे सरकारवर प्रचंड भडकले, ‘राजीनामा का देता,सत्तेत बसून प्रश्न सोडवा’

“जेव्हा या घटना घडत होत्या, तेव्हा दुर्दैवाने काही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते देखील यात सामील असल्याचे लक्षात येत आहे. त्यांची खात्री झाल्यानंतर याची माहिती माध्यमांना दिली जाईल”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT