Eknath Shinde : ‘पेग्विंन… कफनचोर… खिचडीचोर’; CM शिंदे विधानसभेत ठाकरेंवर बरसले
Eknath Shinde Speech : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. रोमिंग छेडाचा उल्लेख करत शिंदेंनी गंभीर आरोप केले.
ADVERTISEMENT

Eknath Shinde Speech in Assembly : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर टीकेची तोफ डागली. कोविड काळात मुंबईत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचे गंभीर आरोप शिंदेंनी केली. आदित्य ठाकरे आणि वरूण सरदेसाई यांच्या नावाचा उल्लेख करत शिंदेंनी रोमिंग छेडाला दिलेल्या कंत्राटांची यादीच वाचली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंवर हल्ला… भाषणातील प्रमुख मुद्दे…
– राज्यातील जनता मृत्यूशी लढा देत भीतीच्या वातावरणात जगत असताना पैसे लुटण्याचा हा किळसवाणा प्रकार पाहिल्यानंतर कुठल्याही सामान्य माणसाच्या मनात तिडिक उठल्याशिवाय राहाणार नाही.
– कफनचोर, खिचडीचोर अशी बिरुदे कमी पडतील, असा थक्क करणारा प्रकार ऑक्सिजन प्लँट उभारणीत या एक फुल-एक हाफने केला आहे.
– आदित्यराजाच्या कृपाकिरणात न्हाऊन निघाल्यानंतर वरुणराजाने अक्षरशः टेंडरचा पाऊस पाडला. उत्तर प्रदेशातील हायवे कंस्ट्रक्शन्स नावाची एक कंपनी आदित्यच्या तेजाने अशी काही तळपली की, स्वतःचे मुख्य काम सोडून रोमिंग पॉवर ऑफ एटर्नी देऊन इतर अवांतर कामांत प्रचंड चमकली.










