Jalgaon Crime : रिल स्टार मुलाचा खून करून बापाने केली आत्महत्या! नेमकं घडलं तरी काय?
Jalgaon Crime Update : माजी सैनिक असलेल्या पित्याने त्यांचा मुलाचा खुन करून स्वत: आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीय.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

धरणगाव तालुक्यातील भोरखेडा गावात घडलीय धक्कादायक घटना

माजी सैनिकाने केला रिल स्टार मुलाचा खुन!

मुलाचा खुन केल्यानंतर माजी सैनिक असलेल्या पित्यानेही संपवलं जीवन
Jalgaon Crime Update : माजी सैनिक असलेल्या पित्याने त्यांचा मुलाचा खुन करून स्वत: आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीय. पेशाने रिल स्टार असलेला माजी सैनिकाचा मुलगा दारुच्या नशेत वडिलांना मारहाण करायचा. मुलाच्या या कृत्यामुळे संतापलेल्या वडिलांनी दोरीने गळा आवळून मुलाचा खुन केला. धक्कादायक बाब म्हणजे मुलाची हत्या केल्यानंतर वडिलांनीही सुसाईड नोट लिहून जीवन संपवण्याचं टोकाचं पाऊल उचललं. ही धक्कादायक घटना धरणगाव तालुक्यातील भोरखेडा गावात गुरुवारी 27 फेब्रुवारीला दुपारी 2 वाजता घडली. या गंभीर घटनेबाबत धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विकी उर्फ हितेश विठ्ठल पाटील (२५) असं खुन झालेल्या तरुणाचं नाव आहे. तर विठ्ठल पाटील असं आत्महत्या केलेल्या माजी सैनिकाचं नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रील स्टार असलेल्या विकी उर्फ हितेश याचे लाखो फॉलोअर्स आहेत. कौटुंबिक कारणामुळे विकी आपल्या वडिलांपासून विभक्त होऊन राहत होता. विकी माजी सैनिक असलेल्या त्याच्या वडिलांना मारहाण करून त्यांचा छळ करायचा. विकीच्या त्रासाला कंटाळून मंगळवारी 25 फेब्रुवारीला विकीच्या वडिलांनी आत्महत्या केली.
हे ही वाचा >> Pune Rape Case: अटक होण्यापूर्वी आरोपीने आत्महत्येचा का केला प्रयत्न? पोलिसांनी सांगितली खळबळजनक माहिती
परंतु, आत्महत्या करण्यापूर्वी विकीच्या वडिलांनी सुसाईट नोट लिहिली. मुलगा हितेश हा दारू पिऊन सातत्याने मारहाण करीत होता. त्याला कंटाळून आपण त्याचा खुन केला आणि भोरखेडा गावाजवळील एका नाल्याजवळ मृतदेह पुरला, असं सुसाईड नोटमध्ये लिहिलं गेलं आहे.
बुधवारी विठ्ठल पाटील यांच्या आत्महत्येचा उलगडा झाल्यानंतर पोलिसांनी तपासाला गती दिली. गुरुवारी तरुणाचा मृतदेह आढळल्यानंतर तो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. घटनास्थळी सुती दोरी आढळली असून त्याद्वारे तरुणाला फाशी दिली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे.
हे ही वाचा >> Pune: पाणी प्यायला गेला अन् पोलिसांना सापडला, नराधम दत्तात्रय गाडेच्या अटकेची Inside Story
शवविच्छेदन अहवालातून नेमकी बाब स्पष्ट होईल, असं अपर पोलीस अधिक्षक कविता नेरकर यांनी म्हटलं आहे. जळगाव पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, एरंडोल निरीक्षक निलेश गाकवाड, धरणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पवनकुमार देसले यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. या घटनेप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याची नोंद करण्यात आलीय.