MP: महाकाल मंदिरात भस्म आरतीच्या वेळी गर्भगृहात लागली आग, पुजाऱ्यांसह 13 जण जखमी

मुंबई तक

ADVERTISEMENT

महाकाल मंदिरात गर्भगृहात लागली आग
महाकाल मंदिरात गर्भगृहात लागली आग
social share
google news

Mahakal Fire: उज्जैन: मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) महाकाल मंदिरात सोमवारी 25 मार्च) सकाळी भस्म आरतीदरम्यान गर्भगृहात अचानक आग लागली. मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात पाच पुजारी आणि चार भाविक गंभीररित्या भाजले आहेत. आरतीदरम्यान गुलाल उधळल्यानंतर आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. धुळवडीमुळे गर्भगृहात आवरण बसवण्यात आले होते. पण त्याच आवरणला आरतीदरम्यान आग लागली. त्याचवेळी गर्भगृहात असलेले पुजारी आणि भाविक हे आगीच्या तडाख्यात सापडले. दरम्यान, सर्व जखमींना तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. (fire broke out during bhasma aarti in mahakal temple madhya pradesh 13 people including priest got burnt )

'घटनेची चौकशी केली जाईल'

उज्जैनचे जिल्हाधिकारी नीरज कुमार सिंह यांनी सांगितले की, 'सकाळी भस्म आरती सुरू असताना आग लागल्याचे प्रकरण समोर आले आहे. या आगीत 13 जण भाजले आहेत. जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याबाबत चौकशी करण्यात येणार आहे. आग कोणत्या पदार्थामुळे लागली याचा प्राथमिक तपास केला जाणार आहे.'

अशी लागली गर्भगृहात आग

वास्तविक, दररोजप्रमाणेच सोमवारीही पहाटे महाकाल मंदिरात भस्म आरती होत होती. पहाटे 5.45 च्या सुमारास आरतीच्या शेवटच्या क्षणी महाकालेश्वरावर गुलालाची उधळण करण्यात येत होती. यासोबतच पुजारीही एकमेकांवरही गुलाल उधळत होते. दरम्यान, आरतीच्या ताटात जळणाऱ्या कापूरवर गुलाल पडल्याने तो विखुरला. यानंतर महाकालवर बांधलेल्या फ्लेक्सने पेट घेतला. यानंतर अचानक आग पसरली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> Video : बापरे! माऊथ फ्रेशनर खाल्ल्याने तोंडातून आलं रक्त

यावेळी पूजा करत असलेले संजय गुरू, दिलीप गुरु, कमल जोशी, विकास, मनोज पुजारी, अंश पुरोहित, सेवक महेश शर्मा, चिंतामण गेहलोत यांच्यासह 13 जण जखमी झाले. सर्व जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जिथे दोघांना किरकोळ दुखापत असल्याने घरी सोडण्यात आले. पण 6 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना इंदूरच्या रुग्णालयात पाठविण्यात आलं आहे.

गर्भगृहात लावले होते फ्लेक्स 

गर्भगृहाच्या भिंती आणि छत हे चांदीने लेपित आहेत. होळीच्या दिवशी महाकालला गुलाल अर्पण केला जातो. त्याचबरोबर पुजारीही एकमेकांना रंग लावतात. या रंगांमुळे गर्भाच्या भिंती खराब होऊ नये म्हणून शिवलिंगावर यंदा प्लास्टिकचे फ्लेक्स लावण्यात आले होते. गाभाऱ्यात एकमेकांवर रंग टाकत असताना आरतीच्या ताटात जळणाऱ्या कापूरवर गुलाल पडला, त्यामुळे कापूर पेटला आणि फ्लेक्सला आग लागली, त्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात येते. मात्र, काही वेळातच आग आटोक्यात आली, पण तोपर्यंत 13 जण भाजले होते.

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> 26/11 सारखा दहशतवादी हल्ला, रशिया हादरलं.. 40 नागरिक ठार

एक दिवस आधीही खेळली गेली होळी

जगप्रसिद्ध महाकालेश्वरच्या प्रांगणात रविवारी संध्याकाळी होळीचा सण सुरू झाला होता. येथे सर्वप्रथम सायंकाळच्या आरतीवेळी हजारो भाविकांनी महाकाल यांच्यासोबत गुलालाची होळी खेळली. त्यानंतर महाकाल प्रांगणात होलिका दहन करण्यात आले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT