Prithviraj Chavan : “राष्ट्रवादीने सरकार पाडले नसते, तर मराठा आरक्षणाचा…”

मुंबई तक

ADVERTISEMENT

Prithviraj Chavan, Former Chief Minister of maharashtra hits out at Sharad pawar's Nationalist Congress Party over maratha reservation issue.
Prithviraj Chavan, Former Chief Minister of maharashtra hits out at Sharad pawar's Nationalist Congress Party over maratha reservation issue.
social share
google news

Congress Leader Prithviraj Chavan on Maratha Reservation : राज्यात ऐरणीवर आलेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठं विधान केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने सरकार पाडले नसते, तर मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली निघाला असता, असे मोठा दावा त्यांनी केला. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसवर गंभीर आरोप केला आहे. (If the Nationalist Congress Party had not withdrawn the support of the alliance government, then the issue of Maratha reservation would have been solved, claim by former chief minister Prithviraj Chavan.)

ADVERTISEMENT

महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या मागणीने जोर धरला आहे. मनोज जरांगे पाटलांनी मराठा समाजातील लोकांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्याची मागणी केली आहे. यासाठी जरांगे पाटील राज्यभर दौरे करत आहे. तर दुसरीकडे शिंदेंच्या मंत्रिमंडळातील छगन भुजबळ यांनी या मागणीला थेटपणे विरोध केला आहे. भुजबळ विरुद्ध जरांगे असा संघर्ष पाहायला मिळत असतानाच पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर खापर फोडलं आहे.

पृथ्वीराज चव्हाणांनी राष्ट्रवादीवर ठेवला ठपका

दिवंगत खासदार राजीव सातव पुरस्कार साखर संचालक संजयकुमार भोसले यांना प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमात बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी मराठा आरक्षणाबद्दल मोठं विधान केलं.

हे वाचलं का?

हेही वाचा >> महायुतीचा फॉर्म्युला ठरला! फडणवीसांनी सांगितलं शिंदे-पवारांना किती जागा?

“हर्षद मेहता घोटाळ्यानंतर खासदार म्हणून माझा आर्थिक बाबींशी पहिल्यांदा संबंध आला. सहकार विभाग शिस्तीसाठी प्रसिद्ध नाही. मोजक्या अधिकाऱ्यांमुळे हा विभाग तग धरून आहे”, असं मत पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडलं.

ADVERTISEMENT

सहकारी बँकेबद्दल निर्णय घेतला अन् राष्ट्रवादीने…

याच मुद्द्यावर पुढे बोलताना माजी मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, “मुख्यमंत्री असताना राज्य सहकारी बँकेबाबत मोठा निर्णय घ्यावा लागला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा काढून घेतला आणि सरकार पडले. राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा काढून घेतला नसता, तर काँग्रेस आघाडीचे सरकार आले असते आणि मराठा आरक्षणाचा प्रश्नही सुटला असता”, असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी या कार्यक्रमात बोलताना केला.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT