Sharad Mohol : गँगस्टर शरद मोहोळ हत्या कटात दोन वकिलही! नावे आली समोर
sharad mohol cctv : शरद मोहोळ हत्या प्रकरणात पुणे पोलिसांनी दहा आरोपींना अटक केली आहे. यात दोन वकिलांचाही समावेश आहे. हे दोघे शिवाजीनगर न्यायालयात वकिली करतात.
ADVERTISEMENT
Sharad Mohol News : शुक्रवारी दुपारी कोथरुडात मुळशी पॅटर्नच्या आठवणी जाग्या करणारं हत्याकांड घडलं. कुख्यात गँगस्टर शरद मोहोळची भररस्त्यात हत्या करण्यात आली. आता तपासातून अशी माहिती समोर आलीये की, त्याच्या चार नव्हे तर सहा गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून, एक धक्कादायक माहिती पोलिसांना मिळाली आहे. शरद मोहोळच्या हत्येचा कटात दोन वकिलही सहभागी आहेत. त्यांची नावेही समोर आली आहेत.
ADVERTISEMENT
पुणे शहर गुन्हे शाखेने गँगस्टर शरद मोहोळ प्रकरणात 10 आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणाचा सखोल तपास पोलीस करत असून, हत्येच्या या कटात दोन वकिलही सहभागी होते, अशी माहिती समोर आली आहे.
शरद मोहोळ हत्या प्रकरणात कुणाला केलीये अटक?
पोलिसांनी गँगस्टर मोहोळ प्रकरणात साहिल ऊर्फ मुन्ना पोळेकर (वय 20, सुतारदरा, कोथरूड), विठ्ठल किसन गांदले (वय 34, सुतारदरा, कोथरुड), अमित मारूती कानगुडे (वय 24, धायरी), नामदेव महिपत कानगुडे (35, भूगाव), चंद्रकांत शाहू शेळके (वय 22, जनता वसाहत, पर्वती), विनायक संतोष गव्हाणकर (वय 20, जनता वसाहत, पर्वती), अॅड. रवींद्र वसंतराव पवार, (वय 40, नांदेगाव), अॅड. संजय रामभाऊ उडान (वय 43, उजवी भुसारी कॉलनी, कोथरूड) यांना अटक केली आहे.
हे वाचलं का?
हेही वाचा >> मामाचा बदला घेतला भाच्याने! शरद मोहोळ हत्याकांडाचा कसा रचला कट?
#पुणे
असा झाला #शरदमोहोळ चा मर्डर
सोबत असणारा साथिदार कोळेकर याने पहिली गोळी पाठीमागून घातली. #cctv फुटेज मधून हत्या कशी झाली हे उघड#pune#punenews#punecrime pic.twitter.com/gh9WRZfQSS— Brijmohan Patil (@brizpatil) January 6, 2024
मामा अन् भाचा सूत्रधार…. दोन वकील मोहोळच्या हत्येचा कटात
पोलिसांच्या तपासात हे समोर आले की, शरद मोहोळ हत्या प्रकरणात मुन्ना पोळेकर आणि नामदेव ऊर्फ मामा कानगुडे हे मुख्य सूत्रधार आहेत. कानगुडे हा पोळेकरचा मामा आहे. शरद मोहोळचे पोळेकरशी जमीन व्यवहारातून दहा वर्षापूर्वी वाद झाले होते. कानगुडे याच्यासोबतही वाद झाला होता. त्यावेळी दोघेही मोहोळला घाबरायचे.
ADVERTISEMENT
हेही वाचा >> “मला तुरुंगातच मरु द्या”, जेट एअरवेजच्या संस्थापकांना न्यायालयात अश्रू अनावर
शरद मोहोळचा काटा काढण्याचे त्यांनी ठरवले. गेल्या काही महिन्यापासून ते शरद मोहोळच्या हत्येचा कट रचत होते. त्यांनी तीन महिन्यांपूर्वी पिस्तूल खरेदी केले होते. दरम्यान, जमीन व्यवहार करणारे अॅड. पवार आणि अॅड. उडान हे शिवाजीनगर न्यायालयात वकिली करतात, त्यांचाही मोहोळ हत्याकटात सहभाग असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी दोघांना अटक केली.
ADVERTISEMENT
न्यायालयात आरोपी वकिलाला अश्रू अनावर
दरम्यान, अटक केल्यानंतर पोलीस सर्व आरोपींना न्यायालयात घेऊन गेले. यावेळी आरोपी असलेल्या एका वकिलाला न्यायाधीशांसमोर अश्रू अनावर झाले. 15 वर्षांपासून वकिली करत आहे. आम्ही काही केले नाही, असे सांगत आरोपी वकील न्यायालयात रडायला लागला. ‘तुम्ही काही केले नसेल, तर घाबरण्याची गरज नाही, असे न्यायाधीशांनी आरोपी वकिलाला सांगितले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT