नवरीला पाहून नवरा खुश झाला..हनिमूनचा प्लॅनही केला! पण 2 आठवड्यातच घडलं भयंकर, नवरी बेपत्ता झाली अन्...
Married Woman Shocking News : छत्तीसगढच्या बिलासपूरमध्ये लव्ह मॅरेजच्या 13 दिवसानंतर एक नवरी गायब झाली. पण ती नेमकी कुठे बेपत्ता झाली, याबाबत कुणालाच माहित नसावं.

बातम्या हायलाइट

लग्नाच्या 13 दिवसानंतर पत्नी झाली बेपत्ता

सूरजने पत्नीसाठी घेतली न्यायालयात धाव आणि..

त्या गावात नेमकं काय घडलं?
Married Woman Shocking News : छत्तीसगढच्या बिलासपूरमध्ये लव्ह मॅरेजच्या 13 दिवसानंतर एक नवरी गायब झाली. पण ती नेमकी कुठे बेपत्ता झाली, याबाबत कुणालाच माहित नसावं. लग्नानंतर दोघेही हनिमूनला जाणार होते. पण लग्नाच्या 13 दिवसानंतर नवरीच्या वडिलांनी तिला गायब केलं. त्यानंतर पतीने पत्नीला अनेक ठिकाणी शोधलं, पण तिचा पत्ता लागला नाही. हे प्रकरण नेमकं आहे तरी काय? याबाबत जाणून घ्या.
हे प्रकरण छत्तीसगढच्या मुंगेली आणि बिलासपूर येथे घडलं. बिलासपूरचा सूरज बंजारे आणि मुंगेलीची एक मुलगी यांच्यात मैत्री होती. दोघांच्या मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं. दोघांनीही रायपूरच्या एका समाज मंदिरात परंपरेनुसार लग्न केलं. त्यांच्या कुटुंबियांना या लग्नाबाबत कोणत्याही प्रकारची माहिती नव्हती. दोघेही पती-पत्नी म्हणून एकत्रित राहू लागले.
सूरजने पत्नीसाठी घेतली न्यायालयात धाव आणि..
पण काही दिवसानंतर तरुणीचे कुटुंबीय तिला भेटण्यासाठी गेले आणि तिला जबरस्ती घेऊन गेले. त्यानंतर तिचा कुठेही पत्ता लागला नाही. त्यानंतर पतीचं टेन्शन वाढलं आणि त्याने याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली होती. पण पोलिसांनी याप्रकरणी कोणतीही कारवाई केली नाही. त्यानंतर सूरजने याप्रकरणी हायकोर्टात याचिका दाखल केली.
हे ही वाचा >> Jai Jawan Dahi Handi 2025: जय जवान गोविंदा पथकही ठरलं सरस, झरझर चढले आणि 10 थर रचले, एकाच दिवस दोन मंडळांकडून विश्वविक्रम!
अचानक बेपत्ता झाली नवरी
सूरजचं म्हणणं आहे की, त्याची पत्नी घरी येणार होती. पण ती जेव्हा घरी आली नाही. तेव्हा पतीनं त्याच्या पत्नीचा शोध सुरु केला. नवरीचे कुटुंबीयही तिच्याबद्दल कोणतीही माहिती देत नव्हते. त्यानंतर सूरजने पोलिसांत तक्रार दाखल केली. पण पोलिसांना त्याला सहकार्य केलं नाही, असा आरोप केला जात आहे. त्यानंतर सूरजने हायकोर्टात याचिका दाखल केली.
या याचिकेत म्हटलं की, तरुणीचे कुटुंबीय तिच्याबद्दल कोणतीही माहिती देत नाहीयत. पत्नीच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती पतीने व्यक्त केली आहे. त्याने म्हटलंय की, या लोकांनी माझ्या पत्नीला मारलं असेल, अशी भीती मला आहे. याचिकाकर्त्याच्या वकिलाने कोर्टात म्हटलं की, तरुणीच्या आयुष्याला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे तिला तातडीनं कोर्टात हजर केलं जावं. जेणेकरून, ती सुरक्षीत आहे की नाही, हे माहित होईल.