Sharad Mohol : मामाचा बदला घेतला भाच्याने! शरद मोहोळ हत्याकांडाचा कसा रचला कट?

ADVERTISEMENT

gangster sharad mohol munna polekar cctv footage murder pune police press conference
gangster sharad mohol munna polekar cctv footage murder pune police press conference
social share
google news

Sharad Mohol Dead : पंकज खेळकर, पुणे : कुख्यात गुंड शरद मोहोळची शुक्रवारी भरदिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्येचा मास्टरमाईंड 20 वर्षीय मुन्ना उर्फ साहिल पोळेकर आहे. मुन्ना पोळेकर याचे मामा नामदेव महिपती कानगुडे आणि नातेवाईक विठ्ठल किसन गांडले यांचा शरद मोहोळसोबत जुना वाद होता. या जुन्या वादातून शरद मोहोळची हत्या करण्यात आल्याची माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी दिली. (gangster sharad mohol munna polekar cctv footage murder pune police press conference)

आरोपी मामा नामदेव महिपती कानगुडे आणि मुन्ना पोळेकरला आधीच शरद मोहोळच्या टोळीत घुसवले. मुन्ना पोळेकर हा सतत शरद मोहोळच्या सोबत असायचा. त्यामुळे शरद मोहोळची दिवसभरातील संपूर्ण माहिती तो आरोपींना देत होता. विशेष म्हणजे शरदच्या या हत्येचा संपूर्ण कट त्याच्याच टोळीत शिजत होता. मात्र त्याला काडीमात्र याची कल्पना नव्हती.

हे ही वाचा : राऊतांना बाळासाहेब म्हणाले, ‘चुपचाप काम कर…’ निरुपमांनी सांगितला राज्यसभा निवडणुकीचा ‘तो’ किस्सा

त्यानंतर शुक्रवारी आरोपींनी शरद मोहोळच्या हत्येचा कट रचला होता. दुपारी एक वाजून वीस मिनिटाच्या सुमारास शरद मोहोळ सुतारदरा येथील घरातून बाहेर पडला. लग्नाचा वाढदिवस असल्यामुळे तो श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी जाणार होता. इतक्यात घराबाहेर पडताच दबा धरून बसलेल्या मुन्ना पोळेकर यानेच शरद मोहोळ यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी परिसरात असलेल्या सीसीटीव्हीच्या मदतीने, सोशल मीडियाच्या माध्यमातून आरोपींची ओळख पटवली. शरद मोहोळला गोळ्या झाडणारे तीन मारेकरी नामदेव कानगुडे या त्यांच्या आणखी एका साथीदारासह सुतारदरा भागातून पळून गेले. मात्र त्यांचे आणखी चार साथीदार त्यांच्यासाठी एक स्विफ्ट कार आणि एक एक्सव्हीयू गाडी घेऊन हजर होते. पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरून या 8 जणांनी साताऱ्याच्या दिशेने वाहनातून पळून जायचे ठरवले होते. मात्र पोलिसांनी त्यांच्या गाड्यांचे नंबर ट्रेस करुन त्यांचा पाठलाग करून शिरवळ हल्लेखोरांना ताब्यात घेतले.

हे ही वाचा : ISRO ची ऐतिहासिक कामगिरी! ‘आदित्य एल1’ पोहोचले निश्चित स्थळी, PM मोदी काय म्हणाले?

पोलिसांनी दोन वाहनातील आठ आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याबरोबरच आणखी दोन वकिलही होते. त्या वकिलांना पोलिसांनी अटक केली आहे. या वकिलांचा आता या प्रकरणात काय सहभाग आहे. याचा तपास पोलीस करीत आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT