Devendra Fadnavis Exclusive : 'बारामतीत सुनेत्रा पवार लीड घेणार', निकालाआधीच फडणवीसांचं मोठं भाकित

साहिल जोशी

ADVERTISEMENT

devendra fadnavis on baramati lok sabha election 2024 sunetra pawar baramati supriya sule ajit pawar eknath shinde
बारामतीची जनता अजित पवारांसोबत आली आहे.
social share
google news

Devendra Fadnavis Exclusive : राष्ट्रवादीतील फुटीनंतर पहिल्यांदाच बारामतीत पवार विरूद्ध पवार लढाई सूरू आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून सुनेत्रा पवार तर शरद पवारांच्या (Sharad Pawar) राष्ट्रवादीतून सुनेत्रा पवार निवडणुकीच्या रिंगणात आमने सामने आहेत. या लोकसभेच्या जागेसाठी मतदान पार पडले आहे. त्यानंतर आता बारामतीत कोण बाजी मारणार? अशी चर्चा आहे. असे असताना राज्याचे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  (Devendra Fadnavis)  यांनी बारामतीचा थेट निकालच सांगितला आहे. बारामतीतून सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) लीड घेतील, असा दावा देंवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. 

मुंबई तकचे संपादक साहिल जोशी यांनी देवेंद्र फडणवीस यांची विशेष मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीत लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने देवेंद्र फडणवीस यांनी अनेक प्रश्नांवर उत्तरे दिली आहेत. बारामती हा शरद पवारांचा गड आहे. त्यामुळे सुप्रिया सुळे कोणत्याही अडथळ्याविणा विजयी होऊ शकतात. कारण पवार साहेबांचं इतक्या वर्षाचं राजकारण आहे. त्यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे. पवार साहेबांची तिकडे चांगली पकड आहे. पण असं असलं तरी बारामतीतून सुनेत्रा पवार लीड घेतील. असा माझा अंदाज आहे आणि तो चुकूही शकतो, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला. 

हे ही वाचा : 'शिंदेंची अखेरची फडफड'; राऊत फडणवीसांना म्हणाले, 'कच्चे मडके'

दरम्यान सुनेत्रा पवारांच्या विजयाचा असाच अर्थ असेल की, बारामतीची जनता अजित पवारांसोबत आली आहे. जर तुम्ही मागची निवडणूक पाहिली तर कांचन कुल 1 लाख मतांनी मागे होत्या.त्या ठिकाणी जर इतका फेरबदल होत असेल तर बारामतीत शरद पवारांची ताकद दिसेल, पण याचा अर्थ असा नाही अजित पवारांसोबत लोकं येणार नाही असं नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

आता देवेंद्र फडणवीस यांनी सुनेत्रा पवार यांच्या विजयाचा केलेला दावा किती खरा ठरतो? सुनेत्रा पवार खरंच बारामतीतून जिंकतात का?  हे 4 जून रोजी येणाऱ्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे. 

हे ही वाचा : 'हिंमत असेल तर 5 प्रश्नांची उत्तरं द्या', बावनकुळेंचं ठाकरेंना चॅलेंज!

    follow whatsapp

    ADVERTISEMENT