Raj Thackeray : पवारांवर राज ठाकरेंचा थेट हल्ला, 'फोडाफोडीच्या राजकारणाला...'

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

raj thackeray criticize sharad pawar udhhav thackera thane rally loksabha election 2024
महाराष्ट्रात फोडाफोडीच्या राजकारणाला शरद पवारांनी सुरूवात केली.
social share
google news

Raj Thackeray criticize Sharad Pawar : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीका आहे. महाराष्ट्रात फोडाफोडीच्या राजकारणाला शरद पवारांनी (Sharad Pawar) सुरूवात केल्याची टीका राज ठाकरे यांनी केली आहे. राज ठाकरे (Raj Thackeray)  इतक्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी फोडफोडीचा संपूर्ण इतिहासच सांगितला.  (raj thackeray criticize sharad pawar udhhav thackera thane rally loksabha election 2024) 

ADVERTISEMENT

ठाण्याचे शिवसेनचे लोकसभेचे उमेदवार नरेश म्हस्के आणि कल्याणचे श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत राज ठाकरे बोलत होते. यावेळी राज ठाकरे यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका केली. महाराष्ट्रात फोडाफोडीच्या राजकारणाला शरद पवारांनी सुरूवात केली. पवारांनी पहिल्यांदा काँग्रेस फोडली. मग पुलोद स्थापण केलं. त्यानंतर 1991 मध्ये शरद पवारांनी छगन भुजबळांना फितवून बाळासाहेबांची पुन्हा शिवसेना फोडायला लावली. त्यावेळी शिवसेनेच्या आमदारांना फोडण्याचे काम शरद पवारांनी केलं. त्याच्यानंतर नारायण राणे यांच्याबरोबर आमदार घेऊन काँग्रेसने पुन्हा शिवसेना फोडली, असा महाराष्ट्रातील फोडाफोडीचा इतिहास राज ठाकरेंनी सांगितला. 

 

हे ही वाचा : ठाण्याची जागा एकनाथ शिंदेंना का दिली? फडणवीसांचा अखेर खुलासा

उद्धव ठाकरेंवर डागल टीकास्त्र 

राज ठाकरेंनी यावेळी उद्धव ठाकरेंवर देखील टीका केली. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांचा लाव रे तो व्हिडिओ दाखवत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला होता. माझे वडील चोरले म्हणता मग बाळासाहेबांवर टीका करणाऱ्या या बाईला पक्षाचे प्रवक्ते कसं केलं. म्हाताऱ्याच्या हातामध्ये तलवार दिल्यावर लढणारा हा हात, असं बोलणाऱ्या व्यक्तीच्या तुम्ही तुमच्या पक्षाचे प्रवक्ते करता, पक्षाचे नेते करता आणि तुम्ही तुमच्या वडिलांवरती प्रेम आहे, म्हणून सांगता, असा सवाल राज ठाकरे यांनी सभेतून केला आहे.

हे वाचलं का?

 ज्या भुजबळांनी बाळासाहेबांना अटक करण्याचा प्रयत्न केला होता. त्या भुजबळांसोबत तुम्ही  भाजपसोबत फारकत घेतल्यानंतर एकाच मंत्रिमंडळात मांडीला मांडी लावून बसतात. तेव्हा वाटलं नाही माझ्या वडिलांना अटक करणाऱ्यासोबत मी बसणार नाही, अशी टीका राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. 

हे ही वाचा : Devendra Fadnavis : 'बारामतीत सुनेत्रा पवार लीड घेणार'

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT