Gold Price: सोन्याचा विषयच हार्ड! किंमत बघूनच म्हणाल बाईईई हा काय प्रकार? जाणून घ्या आजचा भाव...
Gold-Silver Price Today : सणासुदीच्या काळात भारतात मोठ्या प्रमाणात सोने खरेदी मोठ्या प्रमाणात होत असते. सध्या सुरू असलेल्या गणेशोत्सवात सोन्याच्या दरात मोठी तेजी दिसून येत आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
सोन्या-चांदीच्या दरांमध्ये रोज बदल होत असतात.
कधी सोन्या-चांदीच्या दरात वाढ होते तर कधी घसरण पाहायला मिळते
तुमच्या शहरातील आजचा सोन्याचा भाव काय?
Gold-Silver Price Today : सणासुदीच्या काळात भारतात मोठ्या प्रमाणात सोने खरेदी मोठ्या प्रमाणात होत असते. सध्या सुरू असलेल्या गणेशोत्सवात सोन्याच्या दरात मोठी तेजी दिसून येत आहे. गेल्या दोन दिवसांपासून सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. चांदीने तर एकाच दिवसात 3 हजार रुपयांची उसळी घेतली. अशावेळी सोने आणि चांदी लवकरच नवीन विक्रम गाठण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजचे (15 सप्टेंबर) भाव कितीने वाढले सविस्तर जाणून घेऊया. (gold-silver prices hike on today 15 september 2024 in maharashtra know the details)
सोन्या-चांदीच्या दरांमध्ये रोज बदल होत असतात. कधी सोन्या-चांदीच्या दरात वाढ होते तर कधी घसरण पाहायला मिळते. आज रविवारी (15 सप्टेंबर 2024) सोन्याच्या दरात कोणताही बदल झालेला नाही आहे. पण हे भाव प्रचंड महाग आहेत. तर चांदीनेही तुफान उच्चांक गाठला आहे.
हेही वाचा : Sanjay Raut : "मिंधे सेनेच्या लोकांना लेडीज बार...", आनंद आश्रमात पैसे उधळले, संजय राऊत संतापले
Goodreturns वेबसाईटनुसार, शनिवारी (14 सप्टेंबर 2024) 24 कॅरेट 10 ग्रॅम (1 तोळा) सोन्याचा भाव 74, 890 रूपयांवर पोहोचला होता. आजही हा भाव कायम आहे. तर, 22 कॅरेट सोन्याचा भाव 68,650 रूपये आहे. त्याचबरोबर एक किलो चांदीची किंमत 92,000 रूपयांवर पोहोचली आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे भारतात सोने दागिन्यांच्या किंमती बदलत असतात.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
तुमच्या शहरात सोन्याचा भाव काय?
मुंबई
- 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 68,650 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 74,890 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 56,170 रूपये आहे.
पुणे
ADVERTISEMENT
- 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 68,650 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 74,890 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 56,170 रूपये आहे.
नागपूर
ADVERTISEMENT
- 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 68,650 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 74,890 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 56,170 रूपये आहे.
नाशिक
- 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 68,680 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 74,920 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 56,200 रूपये आहे.
22 आणि 24 कॅरेट सोन्यामधील फरक काय?
सोन्याची शुद्धता प्रामुख्याने कॅरेट (K) मध्ये मोजली जाते. दागिन्यांच्या तुकड्यामध्ये किंवा सोन्याच्या वस्तूमध्ये किती शुद्ध सोने समाविष्ट आहे हे कॅरेट प्रणाली दर्शवते. भारतातील सर्वात लोकप्रिय कॅरेट मूल्ये 24, 22, 18 आणि 14 आहेत. शुद्ध सोने 24k मानले जाते, ज्यामध्ये 99.9% सोने असते, तर उर्वरित कॅरेटमध्ये तांबे किंवा चांदीसारख्या मिश्र धातुंचा समावेश होतो.
हेही वाचा : Maharashtra Weather: रविवारची सुट्टी जाणार वाया? राज्यात कसा असेल पावसाचा जोर? IMD चा अंदाज
22 कॅरेट सोने, चांदी, निकेल, जस्त आणि तांबे यासह इतर मिश्रधातूंचे दोन भाग एकत्रित करणारे सोन्याचे मिश्रण आहे. 22 कॅरेट सोने हे 24 कॅरेट सोन्यानंतरचे सर्वोत्तम दर्जाचे आहे. तर, 24 कॅरेट सोने हे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात ग्राहकांना किंवा ज्वेलर्ससाठी उपलब्ध असलेले सर्वात शुद्ध सोने आहे. 24-कॅरेट सोन्यामध्ये तांबे, निकेल, जस्त किंवा चांदी यांसारख्या मिश्र धातुंसह 99.99% सोने असते.
ADVERTISEMENT