Gold Price: सोन्याच्या भावात घसरण! किती रुपयांनी झाले स्वस्त? एका क्लिकवर पाहा आजचे दर

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

सणासुदीच्या काळात भारतात सोने- चांदी खरेदी करण्याचा ट्रेंड वाढला

point

सोन्याच्या किंमतीने मोठा उच्चांक गाठला

point

तुमच्या शहरात सोन्याचा भाव काय?

Gold-Silver Rate Today : सणासुदीच्या काळात भारतात सोने- चांदी खरेदी करण्याचा ट्रेंड वाढताना दिसत आहे. पण, गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किंमतीने मोठा उच्चांक गाठला, तर चांदीच्या दरातही मोठी वाढ दिसून आली, त्यामुळे सोने- चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांचं टेन्शन वाढलं आहे. अशात आता थोडा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. कारण सोन्याच्या किंमतीत घसरण झाली आहे. चला तर मग आजच्या (30 सप्टेंबर 2024) सोने-चांदीच्या किंमतींमधील बदल जाणून घेऊयात. (Gold-Silver rate down 22 24 18 carat today 30 september 2024 in maharashtra mumbai Pune nashik what are the prices)

Goodreturns वेबसाईटनुसार, रविवारी (29 सप्टेंबर 2024) 24 कॅरेट 10 ग्रॅम (1 तोळा) सोन्याचा भाव 77,400 रूपयांवर पोहोचला होता. पण आज यामध्ये 160 रूपयांनी घट झाली असून याची किंमत 77,240 रूपये झाली आहे. तर, 22 कॅरेट सोन्याचा भाव 70,950 रूपये होता. जो 150 रूपयांनी घसरला असून त्याची किंमत 70,800 रूपये झाली आहे. त्याचबरोबर एक किलो चांदीची किंमत 94,900 रूपयांवर पोहोचली आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे भारतात सोने-चांदीच्या दागिन्यांच्या किंमती बदलत असतात.

देशातील मोठ्या शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 77,000 रुपयांच्या पुढे व्यापार करत आहे. हा वाढता दर सोने बाजारासाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे. सोन्याच्या किंमतीत होणाऱ्या या वृद्धीचा परिणाम बाजारातील अस्थिरता आणि जागतिक आर्थिक घडामोडींवर दिसून येत आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हेही वाचा : Maharashtra Weather: काहीसा ब्रेक तर, कुठे सुरूच... 'या' जिल्ह्यांमध्ये मुसळधार! पाहा पावसाचे अपडेट

तुमच्या शहरात सोन्याचा भाव काय?

मुंबई

  • 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 70,800 रूपये आहे.
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 77,240 रूपये आहे. 
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 57,930 रूपये आहे.

पुणे

ADVERTISEMENT

  • 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 70,800 रूपये आहे.
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 77,240 रूपये आहे. 
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 57,930 रूपये आहे.

नागपूर

ADVERTISEMENT

  • 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 70,800 रूपये आहे.
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 77,240 रूपये आहे. 
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 57,930 रूपये आहे.

नाशिक

  • 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 70,970 रूपये आहे.
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 77,270 रूपये आहे. 
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 57,960 रूपये आहे.

22 आणि 24 कॅरेट सोन्यामधील फरक काय?

सोन्याची शुद्धता प्रामुख्याने कॅरेट (K) मध्ये मोजली जाते. दागिन्यांच्या तुकड्यामध्ये किंवा सोन्याच्या वस्तूमध्ये किती शुद्ध सोने समाविष्ट आहे हे कॅरेट प्रणाली दर्शवते. भारतातील सर्वात लोकप्रिय कॅरेट मूल्ये 24, 22, 18 आणि 14 आहेत. शुद्ध सोने 24k मानले जाते, ज्यामध्ये 99.9% सोने असते, तर उर्वरित कॅरेटमध्ये तांबे किंवा चांदीसारख्या मिश्र धातुंचा समावेश होतो.

हेही वाचा : Horoscope In Marathi: 'या' राशीच्या व्यक्तींच्या घरात होईल आर्थिक भरभराट, पण काही राशी होतील Bankrupt?

22 कॅरेट सोने, चांदी, निकेल, जस्त आणि तांबे यासह इतर मिश्रधातूंचे दोन भाग एकत्रित करणारे सोन्याचे मिश्रण आहे. 22 कॅरेट सोने हे 24 कॅरेट सोन्यानंतरचे सर्वोत्तम दर्जाचे आहे. तर, 24 कॅरेट सोने हे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात ग्राहकांना किंवा ज्वेलर्ससाठी उपलब्ध असलेले सर्वात शुद्ध सोने आहे. 24-कॅरेट सोन्यामध्ये तांबे, निकेल, जस्त किंवा चांदी यांसारख्या मिश्र धातुंसह 99.99% सोने असते.


 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT