Maharashtra Weather: काहीसा ब्रेक तर, कुठे सुरूच... 'या' जिल्ह्यांमध्ये मुसळधार! पाहा पावसाचे अपडेट

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

राज्यात सध्या परतीच्या पावसाचा धुमाकूळ

point

IMD कडून 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

point

या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी

Maharashtra Rain : राज्यात सध्या परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. अनेक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे काही भागात शेती पिकांना मोठा फटका बसल्याचं पाहायला मिळत आहे. तर, काही ठिकाणी पावसाने ब्रेक घेतल्याचे चित्र आहे. हवामान अभ्यासकांच्या माहितीनुसार, राज्यात पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता आहे. अशात आज (30 सप्टेंबर 2024) महिना अखेर राज्यात पावसाची स्थिती कशी असेल जाणून घेऊयात. (maharashtra weather forecast rainfall update mumbai pune today 30 september 2024 imd weather report)

ADVERTISEMENT

आजपासून राज्यात पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज आहे. मात्र काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. यामध्ये कोकण, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांचा समावेश आहे. या भागांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. कच्छच्या आखात आणि पूर्व मध्य प्रदेशाजवळ एक धोकादायक चक्री चक्रीवादळ तयार होत आहे. त्यामुळे पावसाचा हा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.

हेही वाचा : Uddhav thackeray : ''हिंमत असेल तर...'', अमित शहांना ठाकरेंनी दिले थेट चॅलेंज

IMD कडून 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, आज सिंधुदुर्ग, बीड, लातूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, उस्मानाबाद या जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून या ठिकाणी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

हे वाचलं का?

तसेच पुण्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुण्यात 28 अंश कमाल तर 21 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल. तर पश्चिम महाष्ट्रातील इतर जिल्ह्यांतही हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.

हेही वाचा : Horoscope In Marathi: 'या' राशीच्या व्यक्तींच्या घरात होईल आर्थिक भरभराट, पण काही राशी होतील Bankrupt?

कोल्हापूर जिल्ह्यात आज मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. कोल्हापूरमधील पन्हाळा, शाहूवाडी, करवीर, राधानगरी, भुदरगड या भागात पावसाचा अंदाज आहे. आज 28 अंश कमाल तर 22 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.

ADVERTISEMENT


 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT