Pandhari Sheth Phadke: बैलगाडा शर्यतींचा नाद, अंगावर किलोभर सोनं मिरवणाऱ्या पंढरीशेठ फडकेचं निधन
बैलगाडा शर्यतील ग्लॅमर प्राप्त करून देणारे आणि गोल्डमॅन म्हणून ओळखले जाणारे पंढरी शेठ फडके यांचे निधन झाल्याचे सांगण्यात आले. गोल्डमॅन म्हणूनही ते प्रसिद्ध होते.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
गोल्डमॅन पंढरी शेठ फडके याचं निधन
बैलगाडा प्रेमी पंढरी शेठ फडकेंचं निधन
Pandhari Sheth Phadke : महाराष्ट्रातील प्रसिद्ध बैलगाडामालक पंढरीशेठ फडके यांचे अल्पशा आजाराने निधन झालं आहे. महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीला ग्लॅमर मिळवून देण्यामध्ये त्यांचा महत्वाचा वाटा होता. बैलगाडा प्रेमी गोल्डमॅन म्हणून ते महाराष्ट्रभर प्रसिद्ध होते. जिथे बैलगाडा शर्यत तिथे पंढरी शेठ फडके हे समीकरण अगदी ठरलेले होते. हातात आणि गळ्यात किलोभर सोने घालून बैलगाडा शर्यतीमध्ये गाडीच्या टपावरती नाच करण्यासाठी ते महाराष्ट्रभर प्रसिद्ध होते.
ADVERTISEMENT
दावणीला 40 ते 50 बैल
बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू व्हावी म्हणून त्यांनी विशेष प्रयत्न केले होते. जवळपास 40-50 शर्यतीचे बैल त्यांच्या दावणीला अजूनही बांधलेले आहेत. मागील वर्षी अंबरनाथ शहरात राहुल पाटील यांच्या गटावर अंदाधुंद गोळीबार केला होता, त्याप्रकरणी त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती.
तीन जिल्ह्यात वेगळी ओळख
गोळीबार प्रकरणानंतर पंढरी शेठ फडके हे जामिनावर सुटले होते. मात्र आज त्यांच्या निधनामुळे पनवेल, ठाणे आणि रायगड जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.
हे वाचलं का?
अंदाधुंद गोळीबार
अंबरनाथमध्ये 2022 मध्ये बैलगाडा शर्यत चालू असतानाच वाद होऊन 13 नोव्हेंबर 2022 रोजी पंढरीनाथ फडके आणि कल्याणचे बैलगाडा मालक राहुल पाटील यांच्यामध्ये वाद झाला होता. त्यानंतर अंदाधुंद गोळीबारही करण्यात आला होता. त्याप्रकरणी त्यांच्यासह एकूण 32 जणांवर हत्येचा प्रयत्न आणि भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पंढरी शेठ फडके नंबर वन
पंढरी शेठ फडके म्हणजे अंगावर किलोभर सोनं, गाडीच्या टपावर बसून वरात आणि बादल बैलाची क्रेझ. पनवेलच्या विहिघरमध्ये राहणारे पंढरीनाथ फडके बैलांना महिन्याभराला लाखभर रुपयांची खाद देत असत. त्या खादीमध्ये शेंगदाणे, काजू, बदाम, डाळ, पिस्ता, खोबरं, अशा खाद देऊन त्यांनी बैलांना तयार केले होतं. त्यामुळेच बैलांच्या तंदुरुस्तीमुळे आणि बैलगाडा शर्यतीमुळे पंढरी शेठ फडके नंबर वनला राहिले होते.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Manoj Jarange : 'प्रचाराला आलेल्या गाड्या ताब्यात घ्या'
बैलावर नजर ठेवणारा शेठ
शर्यत कोणतीही असोत त्यामध्ये एक नंबरला बैल पळायला लागला की त्याच्यावर पंढरी शेठ यांची नजर पडलेली असे. मग त्याची कितीही किंमत असली तरी तो आपल्याकडे घ्यायचाच असा पण पंढरीनाथांचा असे. बैल नजरेत बसला की कितीही पैसे लागू द्या, त्याला विकत घेणारा बैलमालक म्हणूनही पंढरीनाथांची ओळख होती.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT