Govt Jobs : इंडियन कोस्टगार्डमध्ये विविध पदांसाठी भरती सुरु, लगेच अर्ज करा

मुंबई तक

भारतीय तटरक्षक दलात विविध पदांसाठी भरती सुरु आहे. यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 27 ऑक्टोबर आहे. संरक्षण क्षेत्रात करिअर करु इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे.

ADVERTISEMENT

Indian Coast Guard Recruitment
Indian Coast Guard Recruitment
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

इंडियन कोस्टगार्डमध्ये विविध पदांसाठी भरती सुरु

point

लगेच अर्ज करा

Indian Coast Guard Recruitment : भारतीय तटरक्षक दलात (Indian Coast Guard) विविध पदांच्या तब्बल 365 हून अधिक जागांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये नाविक (जनरल ड्युटी), नाविक (डोमेस्टिक ब्रँच), यांत्रिक (मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स) आणि हायजिनिस्ट-I यांसारख्या विविध पदांवर उमेदवारांची निवड केली जाणार आहे. संरक्षण क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी ही एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.

शैक्षणिक पात्रता काय?

या भरतीसाठी पदांनुसार शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आली आहे. नाविक (GD) पदासाठी भौतिकशास्त्र (Physics) आणि गणित (Maths) विषयासह बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, तर नाविक (DB) पदासाठी दहावी उत्तीर्ण ही पात्रता ठेवण्यात आली आहे. यांत्रिक पदासाठी दहावी आणि इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा बारावीसह डिप्लोमा असणे गरजेचे आहे. हायजिनिस्ट-I या पदासाठी दहावी उत्तीर्ण किंवा आयटीआय (ITI) पूर्ण केलेले उमेदवार अर्ज करू शकतात. उमेदवारांची वयोमर्यादा 2002 ते 2009 च्या दरम्यान जन्मतारीख असलेल्यांनुसार ठरवण्यात आली असून अनुसूचित जाती (SC) व जमातीतील (ST) उमेदवारांना 5 वर्षे, तर इतर मागासवर्गीय (OBC) उमेदवारांना 3 वर्षांची सूट नियमानुसार लागू असेल.

हे ही वाचा : सातारा : भूत काढण्याच्या बहाण्याने शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार, भोंदूबाबा गजाआड

'असा' करा अर्ज

या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्जाची फी सामान्य (GEN), इतर मागासवर्गीय (OBC) आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल (EWS) घटकांसाठी 550 रुपये ठेवण्यात आली असून, अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमातीच्या (ST) उमेदवारांना अर्जाच्या शुल्कातून पूर्ण सूट देण्यात आली आहे. पात्र आणि उत्सुक तरुणांनी अधिकृत संकेतस्थळावरून (indiancoastguard.gov.in) मुदतीत ऑनलाइन अर्ज सादर करून या संधीचा लाभ घ्यावा. यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 27 ऑक्टोबर आहे.

हे ही वाचा : तपासणीच्या नावाखाली डॉक्टरचा महिलेच्या प्रायव्हेट पार्टला चुकीचा स्पर्श, पोलिसांकडून अटक

वेतन किती मिळणार?

निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक वेतन आणि विविध भत्ते दिले जाणार आहेत. यांत्रिक पदासाठी 29,200 रुपये (Pay Level-5) मूळ वेतनासोबत 6,200 रुपये यांत्रिक भत्ता आणि इतर भत्ते मिळतील. तर नाविक (GD), नाविक (DB) आणि हायजिनिस्ट-I या पदांसाठी 21,700 रुपये (Pay Level-3) मूळ वेतनासह महागाई भत्ता आणि नोकरीचे ठिकाण व कर्तव्याच्या स्वरूपानुसार अतिरिक्त सरकारी भत्ते देय असतील.